INDIA Alliance PM Face: इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? राहुल गांधींसह 7 जणांच्या नावाची चर्चा

Lok Sabha Election 2024: चार जूनच्या निकालापूर्वीच इंडिया आघाडीत पंतप्रधानपदावरून रस्सीखेच सुरू झालीय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव पुढे केलंय. ठाकरे गटानंही राहुल गांधींच्या नावाला हिरवा कंदिल दिलाय.
इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? राहुल गांधींसह 7 जणांच्या नावाची चर्चा
Rahul Gandhi And Mallikarjun KhargeSaam Tv

विनोद पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

भाजपनं चारशे पारचा नारा दिला असला तरी इंडिया आघाडीलाही विजयाचा मोठी विश्वास आहे. यातच आता इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण अशी चर्चा सुरू झालीय. इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी मल्लिकार्जुन खर्गेंचं नाव पुढे केलं होतं. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी राहुल गांधींचं नाव पुढे केल्यामुळे या चर्चेला आणखीनच वेग आलाय.

खर्गेंची पसंती राहुल गांधीं

काँग्रेसमध्ये आमचे ग्रेट लीडर राहुल गांधी असताना पंतप्रधानपदासाठी माझं नाव पुढे करण्याची काहीच गरज नाही. राहुल गांधी हा देशाला परिचित चेहरा असून त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं मल्लिकार्जुन खर्गेंनी सांगितलं.

इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? राहुल गांधींसह 7 जणांच्या नावाची चर्चा
Lok Sabha Exit Polls: देशात सलग तिसऱ्यांदा मोदी लाट? 3 एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार, इंडिया आघाडीला किती जागा?

खर्गेंच्या या प्रस्तावाला शिवसेनेच्या ठाकरे गटानंही पाठिंबा दर्शवलाय. इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचा चेहरा असून पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं ठाकरे गटानंही सांगितल्यामुळे आता सर्वात आघाडीवर नाव राहुल गांधींचं आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही म्हणाले आहेत की, ''राहुल गांधीचं नेतृत्व देशानं स्वीकारलं आहे.'' असं असलं तरी इंडिया आघाडीतील मित्रपक्षांमधल्या काही नेत्यांची नावं पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत.

इंडिया आघाडीची पंतप्रधान कोण?

राहुल गांधी ही काँग्रेससाठी पहिली पसंती असली तरी इंडिया आघाडीत त्यांच्या नावावर एकमत होईल का प्रश्न आहे. इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांचा मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचं नावही स्पर्धेत आहे. इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी ममता बॅनर्जी यांचंही नाव चर्चेत आहे. ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालमध्ये आघाडी नसली तरी निकालांनंतर बाहेरून पाठिंबा असेल असं जाहीर केलंय.

इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? राहुल गांधींसह 7 जणांच्या नावाची चर्चा
Maharashtra Exit Polls: पवार-ठाकरेंचं नाणं खणखणीत? एक्झिट पोलमध्ये ठाकरे दोन नंबरवर, पवारांच्याही जागा वाढणार?

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदासाठी एखाद्या अर्थशास्त्रज्ञाचाही विचार होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव ऐनवेळी पुढे येऊ शकतं. मात्र त्यांच्या वयाचा मुद्या पुढे येवू शकतो. भाजपला सर्वाधिक आक्रमकपणे विरोध करणारे म्हणून ठाकरे गटाचे पक्षाध्य़क्ष उद्धव ठाकरेंच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

काँग्रेस आतापासूनच राहुल गांधींचं नाव पुढे करत असल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावल्याचं चित्र आहे. मात्र इंडिया आघाडीतील किती पक्ष त्यांच्या नावाला पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र हे सर्व जुळून येण्यासाठी चार जूनला लागणा-या निकालात बाजी मारावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com