Baby Girl Name List : गंगा नदीच्या नावावरून ठेवा तुमच्या चिमुकल्या मुलीचे नाव; जाणून घ्या अर्थ

Baby Girl Name Inspired by Ganga River : प्रत्येक जोडपं मुलगी झाल्यावर फार खुश असतं. अशात तुम्ही तुमच्या मुलीच्या नावासाठी विचार करत असाल तर आम्ही काही सुंदर नावांची लिस्ट आणली आहे.
Baby Girl Name Inspired by Ganga River
Baby Girl Name ListSaam TV

मुलीला जन्म देणे हे प्रत्येक जोडप्याचे भाग्य असते. ज्या घरी मुलगी जन्म घेते त्या घरात समृध्दी, श्रीमंती आणि भरभराट येते असे म्हटले जाते. प्रत्येक जोडपं मुलगी झाल्यावर फार खुश असतं. अशात तुम्ही तुमच्या मुलीच्या नावासाठी विचार करत असाल तर आम्ही काही सुंदर नावांची लिस्ट आणली आहे.

Baby Girl Name Inspired by Ganga River
Name Astrology: z अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोक कसे असतात?

निर्मला

निर्मला हे नाव गंगा नदीच्या नावावरून आलं आहे. निर्मला म्हणजे स्वच्छ, शुद्ध आणि निर्मळ. तुमच्या मुलीसाठी तुम्ही या नावाचा विचार करू शकता.

विमला

विमला या नावाचा अर्थ देखील नितळ आणि शुध्द होतो. नदी पात्रात असलेली स्वच्छ्ता या नावाने दर्शवली जाते. तुमच्या गोड आणि गोंडस मुलीसाठी तुम्ही या नावाचा सुद्धा विचार करू शकता.

स्नेहा

स्नेहा या नावात गंगा नदीचे पावित्र्य दिसते. नदी माय कधीच भेदभाव करत नाही. प्रत्येक सजीवाला ती पाणी देते आणि फुलवते. मुलीसाठी स्नेहा नाव फार सुंदर आहे.

पवित्रा

पवित्र हे सुध्दा नदीच्या गुणांनवरून ठेवलेलं नाव आहे. हे नाव तुमच्या मुलीला भविष्यात ती मोठी झाल्यावर फार मदत करेल. नावाप्रमाणे ती वर्तन देखील तसेच ठेवेल.

जान्हवी

जान्हवी नावाला हिंदू धर्मात जास्त महत्त्व आहे. कारण देवी, माता पार्वती यांचे नाव देखील जान्हवी आहे. त्यांच्या नावावरून तुम्ही तुमच्या कन्येचे नाव ठेवू शकता.

शिवानी

शिवानी हे नाव शंकर देवाशी जोडलेलं आहे. या नावात शिव असल्याने या नावाला फार महत्व आहे. शंकर देवाचे भक्त असाल तर मुलीचं नाव तुम्ही या नावावरून ठेवू शकता.

वंदना

वंदना या नावाचा अर्थ पूजा, अर्चना असा आहे. मुलीच्या नावासाठी वंदना हे नाव उत्तम असून याचा सुंदर अर्थ सुद्धा आहे.

Baby Girl Name Inspired by Ganga River
Baby Names Inspired by Birds : पक्षांच्या नावावरून ठेवा तुमच्या बाळाचं नाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com