'मर्द को दर्द नही होता'... 'मर्द कभी रोते नही'... तु काय मुलगी आहे का? रडायला असे एकापेक्षा एक डायलॉग सिनेमात नेहमीच ऐकायला मिळाले आहेत. पुरुषाला कधी रडूच येत नाही अशी एक प्रकारची भावना समाजात निर्माण झाली.
कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट झाली की, महिलांच्या डोळ्यात पाणी येतं. पण पुरुष हे खूप कमी प्रमाणात इमोशनल होतात असे दृश्य बरेचदा आपल्याला पडद्यावर पाहायला मिळते. रियल लाइफमध्ये देखील तसेच आणि तेच घडते. जेव्हा कधी फॅमिली (Family) किंवा जवळच्या व्यक्तींचा विषय निघालाचं तर पुरुषांने कमकुवत व्हायचं नाही.
पुरुषाला कधीच रडता येतं नाही. परंतु, बायकोच्या समोर कधी रडू कोसळले तर ते खरेच योग्य आहे का? खरेतर लहानपणापासूनच त्यांच्यावर तो मुलगा आहे. मुलं कधी रडत नाही असे संस्कार दिले जातात किंवा मनावर बिंबवले जातात. त्यामुळे त्यांच्या मनात असणारी ही भावना मनातच जडून राहाते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर.
पुरुषांना त्यांच्या भावना कधीही कुणासमोर दाखवू नका असे शिकवले आणि सांगितले जाते. परंतु, महिलांना जितक्या सहजतेने आपल्या भावना मांडून मोकळे होता येते तितक्या सहज पुरुषांना जमत नाही.
पुरुष इतर पुरुषांसमोर कमी रडतात. याचे कारण मर्द को कभी दर्द नही होता अशा डायलॉगला ते फॉलो करत असतात. त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणींसमोर अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्याची इच्छा देखील त्यांची कमी असते. तसेच स्त्रिया (Women) त्यांच्या भावना समजून घेण्याची शक्यता अधिक कमी असते.
जर पती (Husband) रडत असेल तर पत्नीने त्याला साथ दिली तर भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होण्यास मदत होते. यामुळे रडल्यामुळे त्यांना हलके वाटते. सकारात्मक भावना मनात निर्माण होतात. त्यांच्या या भावना चांगल्या प्रकारे ते समजू शकतात. तसेच त्यांना नकारात्मक विचारांपासून वाचवते.
बरेचदा पुरुष त्यांच्या भावना व्यक्त करताना घाबरतात. पण जर काही कारणांमुळे ते रडले तर त्यांना कोणत्या तरी गोष्टींचा अधिक त्रास झालेला असतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.