Relationship Tips : पार्टनरसोबत आहात पण नात्यात प्रेम उरले नाही? नातं तुटण्याआधीच या गोष्टींची काळजी घ्या

Relationship Tips After Marriage : लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांचे आयुष्य बदलते. लग्नानंतर आपल्या नात्यात अनेक बदल होतात. बरेचदा कौटुंबिक, वैयक्तिक कारणांमुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद निर्माण होतात आणि नात्यातील प्रेम हळूहळू संपू लागते.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv
Published On

How To Keep The Spark Alive In Your Relationship :

नात्यात प्रेम, विश्वास, काळजी आणि आपुलकी असेल तर ते नातं अधिक काळ टिकत. या गोष्टी नात्यात नसतील तर त्यात दूरावा येऊ लागतो. नात्यात प्रेम असेल तर त्यात गोडावा अधिक काळ टिकून राहातो.

लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांचे आयुष्य बदलते. लग्नानंतर आपल्या नात्यात अनेक बदल होतात. बरेचदा कौटुंबिक, वैयक्तिक कारणांमुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद निर्माण होतात आणि नात्यातील प्रेम हळूहळू संपू लागते.

वय वाढू लागले की, नात्यातील (Relation) प्रेम कमी होऊ लागते. जबाबदाऱ्यांमुळे नात्यातील उत्साह हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे जोडीदाराप्रती (Partner) असणाऱ्या भावना देखील जाणवत नाही. त्यामुळे नात्यातील अंतर वाढू लागते. अशाच परिस्थीतून तुम्ही देखील जात असाल तर वेळीच काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

1. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका

जेव्हा नात्यात मतभेद निर्माण होतात तेव्हा कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. त्यामुळे एकत्र राहाणे कठीण होते. अशावेळी जोडीदाराच्या कमकुवत गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा चांगल्या गुणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घाईत घेतलेल्या निर्णयामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते.

Relationship Tips
Relationship Tips : लग्न झाल्यानंतर संसार सुखाचा करायचा आहे? मग या गोष्टी लक्षात ठेवाच!

2. मत व्यक्त करा

अमेरिकेतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ एमिली एच सँडर्स म्हणतात की, नात्यात असणारे प्रेम हे वेळोवेळी व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे नात्यात गोडवा टिकून राहातो. यामुळे तुमच्या नात्यात कधीच दूरावा येणार नाही.

3. चर्चा करा

बरेचदा नात्यात भांडण होतात ज्यामुळे नवरा-बायको (Husband-wife) एकमेकांशी बोलणे टाळतात. असे वागणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नात्यातील संवाद कमी होतो. नात्याला निरोगी आणि मजबूत ठेवायचे असेल तर संवाद करणे अधिक गरजेचे असते.

Relationship Tips
Relationship Tips : तुम्हीदेखील सोशल मीडियावर तुमचं नातं शेअर करताय? येऊ शकतो दुरावा, संशोधनातून खुलासा

4. भावनिकदृष्ट्या जवळ रहा

नात्यात शारीरिक संबंधासोबत मानसिक संतुलन असणे देखील गरजेचे आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी शारीरिक कृती करणे गरजेचे नाही. अशावेळी जोडीदाराला भावनिकरित्या समजून घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com