Relationship Tips : दिवाळीमध्ये पार्टनरसोबत ही कामे केलीच पाहिजेत; वर्षभर नात्यात प्रेम राहील

Relationship Tips for Diwali : यंदाची दिवाळी तुम्हाला कायम लक्षात राहावी यासाठी पार्टनरबरोबर काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे असते. आज या बातमीमधून त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
Relationship Tips for Diwali
Relationship TipsSaam TV
Published On

दिवाळी सण म्हणजे एक सुंदर आणि वर्षातील सर्वात मोठा उस्तव. दिवाळीला आपल्या घरी अनेक पाहुणे येतात. एकमेकांना शुभेच्छा आणि खूप सारे गिफ्ट दिले जातात. दिवाळी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील वर्षातला खास सण. या सणामध्ये बहीण भाऊ, पती पत्नी यांचे नाते देखील साजरे केले जाते. आता यंदाची दिवाळी तुम्हाला कायम लक्षात राहावी यासाठी पार्टनरबरोबर काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे असते. आज या बातमीमधून त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

Relationship Tips for Diwali
Relationship Tips: तुमच्या पार्टनरला कसं खूश ठेवाल? सोनाक्षी सिन्हाच्या या भन्नाट ट्रिक्स करा फॉलो

एकत्र शॉपिंग करा

दिवाळीमध्ये प्रत्येकाला नवीन कपडे परिधान करायचे असतात. त्यासाठी प्रत्येक जण शॉपिंग करतो. तुम्ही देखील शॉपिंगला जाताना पर्टनरला सोबत घेऊन जा. दोघांनी एकमेकांच्या आवडीचे कपडे आणि अन्य वस्तू खरेदी करा. तसेच दिवाळीमध्ये अनेक नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. घरात सुंदर दिवे आणि कंदील घेतला जातो. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मिळून या सर्व वस्तूंची खरेदी केली पाहिजे.

एकत्र फराळ बनवा

दिवाळीत प्रत्येकाच्या घरी लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळी आणि करंजी बनवली जाते. हे सर्व पदार्थ बनवणे तितकेसे सोपे नाही. त्यात बरीच मेहनत लागते आणि वेळही जातो. काही घरामध्ये बाहेरून फराळ आणले जाते. मात्र त्याला घरच्या प्रेमाचा स्वाद नसतो. त्यामुळे तुम्ही पार्टनरसोबत मिळून घरातच फराळ बनवा. यामुळे पती पत्नीमधील नात्यात आणखी जास्त प्रेम निर्माण होते.

काही कार्यक्रम एकत्र साजरे करा

दिवाळीमध्ये अनेक कार्यक्रम असतात. दिवाळी पहाटसह अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मग पार्टनरसह सहभागी व्हा. येथे तुम्हाला वर्षभर आठवणीत राहतील अशा आठवणी साठवता येतील.

सरप्राइज द्या

दिवाळीमध्ये पती पत्नी साठी पाडवा असतो. पाडव्याला पती आणि पत्नी दोघेही एकमेकांना गिफ्ट देतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरसाठी काही गिफ्ट खरेदी करा. तसेच पर्टनरला दिवाळीचे छान सरप्राइज द्या. याने पार्टनर खुश होईल.

Relationship Tips for Diwali
Relationship Tips : पार्टनरचा इतका राग आलाय की नातं तोडावं वाटत आहे? मग या टिप्स नक्की फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com