Relationship Tips : पार्टनरचा इतका राग आलाय की नातं तोडावं वाटत आहे? मग या टिप्स नक्की फॉलो करा

How to solve a fight in a relationship? : पार्टनरसोबत सतत वाद होत असेल आणि तुम्ही हे नातं संपवण्याचा विचार करत असाल तर पुढील काही टिप्स फॉलो करा.
Relationship Tips On Divorce
Relationship TipsSaam TV
Published On

नात्यात विविध कारणांवरून रोज भांडणे होत असतात. भांडणे झाली की सुरुवातील पती-पत्नी किंवा गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड दोघेही एकमेकांना फार बोलतात. एकमेकांचा अपमान करतात. यामुळे दोघांकडून रागात एकमेकांचा अपमान होतो. बऱ्याचदा ज्या कारणावरून वादाला सुरुवात झाली ते कारण दूर राहते. मात्र अन्य संवादामुळे आणि झालेल्या अपमानामुळे वाद प्रचंड वाढत जातो.

Relationship Tips On Divorce
Relationship Tips : सकाळी उठल्याबरोबर पार्टनरसाठी या गोष्टी नक्की करा; नात्यातील प्रेम कधीच कमी होणार नाही

नात्यात सतत होणाऱ्या भांडणांमुळे दोघांच्याही डोक्यात सतत तेच विषय फिरत राहतात. काही केल्या मनात उठलेलं काहूर शांत होत नाही. शेवटी रागाच्या भरात हे नातं कायमचं संपवावं असा विचार दोघांच्याही मनात येतो. आता तुमच्याही नात्यातील भांडणे वाढली असतील आणि वाद विकोपाला पोहचला असेल तर काय केले पाहिजे याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

पार्टनरच्या चांगल्या गोष्टी आठवा

जर तुमचे तुमच्या पार्टनरवर जीवापाड प्रेम असेल आणि तुम्हाला त्यांना गमवायचे नसेल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यासाठी पार्टनरला ओरडू नका. पार्टनर रागात असेल तर त्याला समजून द्या. तसेच पार्टनरने तुम्हाला काही वाईट शब्द वापरले आणि त्यामुळे तुमच्या मनात राग जास्त वाढला तर राग शांत करण्यासाठी पार्टनरच्या चांगल्या गोष्टी आठवा. पार्टनरच्या चांगल्या गोष्टी आठवणे आपल्यासाठी कठीण असते. मात्र अशावेळी राग शांत करण्यासाठी आपल्या पार्टनरने आपल्यासाठी काय काय चांगले केले आहे ते सर्व आठवा.

पार्टनरशी स्पष्ट बोला

नात्यात सतत वाद होत असतील तर दोघांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. संवाद अर्धवट ठेवून झोपू नका. कारण वाद झाल्याने डोकं गरम राहतं. आपलं रक्त देखील उसळतं. त्याने हार्टअटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक सारख्या समस्या सुद्धा उद्भवतात. त्यामुळे वाद झाल्यावर पार्टनरशी शांततेत संवाद साधा.

उलट बोलू नका

पार्टनर जेव्हा रागात असतो आणि तुमच्याशी वाद करत असतो तेव्हा तुम्ही त्याचं ऐकावं असं त्याला वाटत असतं. मात्र यावेळी समोरच्या व्यक्तीला देखील राग येतो आणि वाद वाढतात. त्यामुळे बऱ्याचदा पार्टनर रागात असेल तेव्हा त्याला उलट बोलू नका. पार्टनर जे सांगत आहे ते शांततेत ऐका आणि त्यानुसार वागा.

Relationship Tips On Divorce
Ananya Panday Relationship : गंभीर आजाराशी झुंज देत अनन्या व्यक्त केली मोठी इच्छा; म्हणाली, मला एका जोडीदाराची गरज आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com