Mood Swings: सतत मूड स्विंग होतात का? तुमच्या खाण्या-पिण्यातच दडलंय कारण...

Deal with mood swings:तुम्ही जितके कार्ब्सयुक्त पदार्थ खाता तितकाच परिणाम तुमच्या शरीरावर होतो. अशा पदार्थांमुळे शरीरातल्या साखरेचे प्रमाण वाढतं आणि वजनसुद्धा वाढतं. यामुळेच तुम्हाला मूड स्विंग होत असतात.
foods
Mood Swingscanva
Published On

सिंपल कार्बोहाइट्रेड

पचनासाठी शरीराला सिंपल कार्बोहायट्रेड खूप आवश्यक असतं. त्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. सिंपल कार्बोहायट्रेड मध्ये दुधाच्या पदार्थांचा समावेश होतो. त्यात दुध, अंडी, फळ आणि दुग्धजन्य पदार्थसुद्धा येतात. सिरप, सॉफ्ट ड्रिंक, चॉकलेट कॅडी आणि टेबल शुगर यामध्ये सिंपल कार्ब्स असतात. त्यामुळे तुम्हाला सतत मूड स्विंग होऊ शकतात.

मूड स्विंग

मूड स्विंगमध्ये आपल्याला सतत वेगळे विचार येतात आणि आपण त्या पद्धतीने वागतो. त्यात कधी-कधी उगाच छोट्या गोष्टींचा राग येतो. त्यामुळे खूप चिडचिड होते. काही वेळेस फक्त शांत राहायला आवडतं. हे महिलांना बऱ्याचदा मासिक पाळी दरम्यान होतं. खरं तर बाकीवेळेस सुद्धा महिलांना मूड स्विंग होतात. त्याचं कारण म्हणजे रोजचा आहार.

Mood Swings
Mood SwingsCanva

मूड स्विंग काय खाण्याने होतात?

नेहमी सात्विक आहार खाणं शरिरासाठी महत्वाचं असतं. यामुळे आपण हेल्दी जीवन जगू शकतो. आपली पचनसंस्था सुरळीत होते. तज्ञांच्या मते, आपण जो आहार खातो त्याचा परिणाम आपल्या मेंटल हेल्थवर होत असतो. त्यात गरजेहून जास्त कार्बोहायट्रेड कार्ब्सचे सेवन केल्याने आपल्याला सतत वेगवेगळे मूड स्विंग होतात. सिंपल कार्बोहायट्रेडमध्ये दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या, धान्य, काजू, शेंगा , गोड पदार्थ आणि मिठाईचा समावेश असतो. याचे अती सेवन केल्याने आपल्याला मूड स्विंग होत असतात.

foods
Prostate cancer कोणत्या पुरुषांना होतो, नेमका धोका काय? काळजी काय घ्याल?

शरीरावर काय परिणाम होतो?

तुम्ही कार्बोहाइट्रेड पदार्थांचे जास्त सेवन करत असाल तर ते तुमच्या शरिरासाठी घातक असू शकतं. यामुळे डायबिटीजचे प्रमाण वाढू शकतं, शरिरातल्या फॅटचं प्रमाण वाढू शकतं, लठ्ठपणा येतो आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं. यामुळे ओरल हेल्थवर परिणाम होऊ शकतो. त्यात अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. यासाठी काही लोक लो कार्ब्स डाएट प्लान करतात. यामुळे तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होऊ शकतात. यासाठी तुम्ही वैद्यकीय तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

foods
Ghevar Recipe : लाडक्या गणरायाला बनवा 'घेवर'चा चविष्ट नैवेद्य; वाचा सिंपल रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com