Bhagavad Gita: तुम्हाला क्रोध येण्याचं खरं कारण माहितीये का? श्रीकृष्णांचं भगवद्‌गीतेतील गूढ उत्तर जाणून घ्या

Bhagavad Gita Real Reason for Anger: देवगुरू श्रीकृष्ण यांनी भगवतगीतेत क्रोधाचे जे खरे मूळ कारण सांगितलं आहे. ते अत्यंत सखोल आणि आत्मिक आहे.
Bhagavad Gita Real Reason for Anger
Bhagavad Gita Real Reason for Angersaam tv
Published On

"क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥" (भगवद्गीता २.६३)

क्रोध हा शक्तिशाली वाटतो खरा मात्र प्रत्यक्षात तो आपली ऊर्जा क्षीण करतो. भगवद्गीतेनुसार राग म्हणजेच क्रोध हा नरकाचे तीन द्वारांपैकी एक आहे. क्रोध मुळातच इच्छा आणि अहंकारातून जन्म घेतो. श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवतात की, खरी ताकद इतरांशी लढण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आहे.

प्रतिक्रिया देण्याआधी थांबा

ज्यावेळी तुम्हाला राग येतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, बाहेरचा अग्नी तुम्हाला तेव्हाच आतून जाळतो जेव्हा तुम्ही त्याला आत प्रवेश करू देता. श्रीकृष्ण अर्जुनाला आठवण करून देतात की, शांत मन हे हजार शस्त्रांपेक्षा बलवान असतं. भावना उफाळल्या की, दडपण नव्हे तर जागरूकता शांती देते. अशावेळी एक पाऊल मागे घ्या, श्वास घ्या, आणि क्रोधाला ओळखा तो तुमची ओळख नाही.

Bhagavad Gita Real Reason for Anger
Bhagavad Gita: भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली मनुष्याच्या बर्बादीची कारणं; वेळीच व्हा सावध

प्रतिक्रिया देण्यापेक्षा मूळ कारण ओळखा

राग जर अचानक उफाळत नाही तो आत खोलवर आधीच जन्म घेत असतो. अनेकदा तो इतरांमुळे नसतो तर आपल्या आतल्या वेदना, भीती किंवा अपेक्षाभंगामुळे तयार झालेला असतो. भगवद्गीता सांगते की, क्रोध आपले विवेक आपल्याला शांतीपासून दूर नेतो. मुळात खरी ताकद मोठ्याने ओरडण्यात नाही तर थांबण्यात, श्वास घेण्यात आणि भावनांकडे न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहण्यामध्ये आहे.

Bhagavad Gita Real Reason for Anger
Bhagavad Gita: तोंडात साखर अन् डोक्यावर बर्फ! कुणालाही न दुखावता योग्य निर्णय कसा घ्याल? भगवद्गीतेतील संदेश आयुष्य बदलून टाकेल

अहंकारापासून वेगळे व्हा

"अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः।

मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः॥"

ज्यावेळी अहंकार तुमच्या मनावर राज्य करतो त्यावेळी समज कमी होतो आणि शांती हरवून जाते. मात्र ज्यावेळी शहाणपण जागृत होतं, तेव्हा शांती आणि नम्रपणा त्याची जागा घेते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, खरी ताकद इतरांना चुकीचं सिद्ध करण्यात नाही, तर स्वतःच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यात आहे. "मी" आणि "माझं" यापासून दूर गेल्यावर तुम्हाला असलेला राग आपोआप शांत होतो.

Bhagavad Gita Real Reason for Anger
Remedies in Bhagavad Gita: अतिविचाराने मनस्ताप होतोय, मन ताळ्यावर राहत नाही, भगवान कृष्णांनी भगवद्‌गीतेत सांगितला रामबाण उपाय

नियंत्रणापेक्षा शांतता निवडा

अनेकांना इतरांना नियंत्रणात ठेवणं आवडतं. मात्र खरी ताकद इतरांवर किती नियंत्रण आहे यामध्ये नाहीये. खरी ताकद ही क्षणात दिसतं जेव्हा सगळं कोसळत असतानाही तुम्ही शांत राहता त्यामध्ये आहे. भगवद्गीता सांगते की, शांती आतून सुरू होते जेव्हा तुम्ही मनावर प्रभुत्व मिळवता, तेव्हा बाहेरचं जग तुम्हाला हादरवू शकत नाही.

Bhagavad Gita Real Reason for Anger
Bhagavad Gita: भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली आहेत ४ महापापं; अशी कामं केल्यास कधीच मिळू शकणार नाही माफी

जे बदलता येणं शक्य नाही ते ते स्विकारा

अनेकदा क्रोध इतरांमुळे नसतो तर "जे आहे" त्याला नाकारण्यामुळे असतो. आपण वास्तवाशी लढतो, जीवन वेगळं असावं अशी अपेक्षा करतो. श्रीकृष्ण कर्मयोगातून शिकवतात की, कृती प्रामाणिकपणे करा, पण फळाची चिंता करू नका. खरी शांती तेव्हा मिळेल ज्यावेळी आपण जीवन आपल्या अपेक्षांनुसार चालावं अशी मागणी थांबवतो आणि त्याच्या प्रवाहावर विश्वास ठेवतो. स्वीकार म्हणजे पराभव नाही, तर ती शुद्ध स्वरूपातील ताकद आहे.

Bhagavad Gita Real Reason for Anger
Bhagavad Gita : मनुष्य पापं करण्यासाठी का भाग पडतो? भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली कारणं

टीप : वरील सर्व माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com