Rang Panchami 2025 : लग्न जुळत नाही? रंगपंचमीच्या दिवशी करा ५ उपाय, लवकरच होईल शुभमंगल सावधान

marriage obstacles remedies : तुम्हाला लग्न जुळत नाही, तर रंगपंचमीच्या दिवशी ५ उपाय करा. तुमचं लवकरच शुभमंगल सावधान होईल.
Rang Panchami
Rang Panchami 2025 Saam tv
Published On

रंग पंचमी दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी केली जाते. रंगपंचमीला श्रीरंग पंचमी किंवा देव पंचमी देखील म्हटलं जातं. ही रंग पंचमी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. रंचपंचमीचा दिवस हा राधा-कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या रंगोत्सवाचा समाप्तीचा दिवस आहे. या दिवशी खास उपाय केल्यास जीवनात सुख, समृद्धी आवि विवाहाविषयीच्या अडचणी दूर होतील. रंगपंचमी १९ मार्च २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी ५ उपाय केल्यानंतर विवाह जुळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

राधा-कृष्णाला गुलाल अर्पण करा

रंगपंचमीला राधा आणि श्रीकृष्णाच्या चरणी पिवळा आणि लाल रंगाचा गुलाल अर्पण करणे शुभ मानलं जातं. या उपायाने विवाहाला लागणारा वेळ कमी होतो. तसेच वैवाहिक जीवन सुखी होण्यास मदत होते. राधा आणि कृष्णाची पूजा केल्यानंतर लग्नाचा चांगला योग जुळून येतो. तसेच गुलाल अर्पित केल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो.

Rang Panchami
PM Narendra Modi : तुम्ही मृत्यूला घाबरता का? PM नरेंद्र मोदींनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं

कमळाच्या फुलावर लक्ष्मी-नारायणाचा फोटो ठेवा

रंचपंचमीच्या दिवशी घरात कमळाच्या फुलावर लक्ष्मी-नारायणचा फोटो ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. यामुळे घरात धन वर्षाव होतो. कुटुंबात प्रेम वाढते. या उपायामुळे चांगले स्थळ येण्यासही सुरुवात होते. रंगपंचमीच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे शुभ मानलं जातं. लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केल्याने घरात धनाची कमतरता राहत नाही. या उपायामुळे कुटुंबातील नाते दृढ होते.

माता लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करा

रंगपंचमीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यांची विधिवत पूजा केल्यानंतर घरात धनाचं आगमन होतं. कौटुंबीक नातेही मजबूत होतात. दोघांची पूजा केल्याने घरात सुख-शांती येते.

Rang Panchami
Pune Tourist Places : पुण्यात फिरण्याचा प्लान करताय? या ठिकाणांशिवाय पिकनिक पूर्ण होऊच शकत नाही

सूर्यदेवाला जल अर्पण करा

रंगपंचमीच्या दिवशी सूर्य देवाला जल अर्पित करा. जल अर्पित केल्यावर वैवाहिक जीवन सुखमय आणि समृद्ध होतं. सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पन केल्याने विवाह संबंधित समस्या दूर होतात. यामुळे जीवनात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. सूर्याच्या उपासनेमुळे नात्यात प्रेम आणि आदर वाढतो.

Rang Panchami
Horoscope Today : सोमवार ठरणार आर्थिक अडचणीचा, तर काहींना पाठीवर मिळेल शाबासकीची थाप; वाचा आजचं राशीभविष्य

सूर्य चालीसा पठण करा

वैवाहिक जीवनात काही समस्या येत असेल, तर रंगपंचमीच्या दिवशी सूर्य चालीसा पठण करा. यामुळे नात्यातील समस्या दूर होतात. घरात सुख-शांती निर्माण होते. सूर्य चालीसा दररोज पठण केल्यास वैवाहिक जीवनात सामंजस्यपणा येतो. घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह निर्माण होतो.

डिस्क्लेमर - लेखात दिलेली माहिती धार्मिक शास्त्राच्या मान्यता असलेल्या आधारांवर देण्यात आली आहे. साम टीव्ही माहितीची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com