भावा बहिणीच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन. रक्षाबंधन सणाची भाऊ बहिण खूप आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते अन् बहिणीला भेटवस्तू देतो. तुम्ही तुमच्या बहिणीला तिच्या भविष्यासाठी योग्य अशी भेटवस्तू देऊ शकता.
रक्षाबंधनला बहिण भावाला ओवाळते, राखी बांधते. भाऊ तिला आयुष्यभर सुरक्षित ठेवण्याचे वचन देतो. आता हेच वचन तुम्ही तुमच्या गिफ्टने पूर्ण करु शकतात. तिच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी गुंतवणूक तुम्ही आतापासूनच करु शकतात.
बहिणीच्या सुरक्षेसाठी एखादी गुंतवणूक करा. तिलाही हे गिफ्ट नक्कीच आवडेल. आजकाल गुंतवणूकीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे येत्या रक्षाबंधनाला बहिणीच्या भविष्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या. बहिणीच्या भविष्यासाठी योग्य अशा भेटवस्तू आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बॅंका आणि पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही एफडी करु शकतात. एफडीद्वारे जी रक्कम बँकेत भरली केली जाते त्यावर ठरावीक व्याज मिळते. तुम्ही ही एफडी किती वर्ष करता, त्यावर तुमच्या बहिणीलाही ठरावीक व्याज मिळेल. तुम्ही तुमच्या बहिणीला रक्षाबंधनसाठी एफडी गिफ्ट देऊ शकता.
एफडी अंतर्गत, लोकांना ठरावीक काळासाठी एकरकमी किंमत जमा करावी लागते. तसेच जास्त काळासाठी एफडी केल्यास त्यावर तुम्हाला टॅक्समध्येही फायदा होईल. बहिणीला अशी भेटवस्तू दिल्याने ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. बहिणीलाही ही भेटवस्तू खूप आवडेल.
गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा खूप चांगला पर्याय आहे. बहिणीचे डिमॅट खाते उघडून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करता येईल. तिच्या नावाने एसआयपी सुरू करता येईल. ज्यात दर महिन्याला तुम्ही पैसे गुंतवणूक करु शकता. तिच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी हे पैसे उपयोगी येतील.
बहिणीला तुम्ही एखादी सोन्याची वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता. सोन्याची वस्तूही एक प्रकारची गुंतवणूकच आहे. भविष्यात कधी गरज पडली तर सोने आपण आर्थिक मदतीसाठी वापरु शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.