Toyota Rumion Launch
Toyota Rumion LaunchSaam Tv

Toyota Rumion Launched : फॅमिलीचा प्रवास होणार सुकर! 26km मायलेजसह Toyotaची सर्वात स्वस्त 7 सीटर लॉन्च...

New Toyota Launch : कारच्या उद्योगात टोयोटा कंपनीचे नाव अग्रेसर आहे. ग्राहक नेहमीच टोयोटोच्या कारला प्राधान्य देतात.
Published on

Rumion Car : कारच्या उद्योगात टोयोटा कंपनीचे नाव अग्रेसर आहे. ग्राहक नेहमीच टोयोटोच्या कारला प्राधान्य देतात. नुकतीच Toyota Kirloskar Motors ने नवीन कार बाजारात लॉन्च केली आहे. ही कार मोठ्या कुटुंबासाठी अगदी योग्य आहे. या कारची रचना एका मोठ्या कुटुंबाकडे बघून करण्यात आली आहे.

Toyota ने Toyota Rumion ही त्यांची ७ सीटर कार बाजारात (Market) लॉन्च केली आहे. ही कार मारुती सुझुकीच्या प्रसिद्ध MPV Maruti Ertiga वर आधारित आहे. ज्यामध्ये Toyota ने काही बदल केले आहेत. ही कार ३ प्रकार आणि ६ ट्रिममध्ये सादर करण्यात आली आहे. टोयोटाच्या या नवीन कारमध्ये CNG पर्यायदेखील उपलब्ध आहे. Toyota Rumion ची किंमत १०.२९ लाख ते ११.२४ लाख रुपये आहे.

Toyota Rumion Launch
Toyota's New Car Launch: नविन Innova रेग्युलर पेट्रोलवर नाही तर खास इंधनावर धावेल! गडकरींच्या हस्ते होणार लॉन्च, जाणून घ्या काय असेल खास

Toyota Rumion ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त ७ सीटर कार आहे. ही कार मोठ्या कुटुंबासाठी अतिशय योग्य आहे. या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. ग्राहक फक्त ११,००० रुपयांची टोकन रक्कम देऊन ही कार बुक करु शकतात. या कारच्या CNG प्रकाराची किंमत ११.२४ लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या महणण्यानुसार, ही कार २६ किमी पर्यंत मायलेज देते.

Toyota Rumion कार नक्की कशी आहे

Toyota Rumion कारची रचना ही प्रामुख्याने मोठ्या कुटुंबासाठी करण्यात आली आहे. अत्यंत सोईस्कर आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी कारची रचना आहे. प्रशस्त भागामुळे ड्रायव्हरला कार (Car) चालवताना आरामदायी अनुभव येईल. कंपनीने कारला पेट्रोल इंजिन तसेच निओ ड्राइव्ह तसेच ई-सीएनजीसोबत उपलब्ध असेल.

image-fallback
Toyota Innova गाडीतून चक्क गायीची चोरी! Yavatmal मधील CCTV कॅमेऱ्यात कैद

इंजिन

कंपनीने टोयोटा रुमीओमध्ये १.५ लीटरच्या के- सीरीज इंजिन वापरले आहे. जे एर्टिगाप्रमाणेच CNGसह उपलब्ध असेल. पेट्रोल मोडमध्ये ही कार 75.8 kW चा पॉवर आउटपुट आणि 136.8 Nm टॉर्क जनरेट करते. तर CNG मोडमध्ये हे इंजिन 64.6 kw चा पॉवर आणि 121.5 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडले आहे.

मायलेज

कंपनीच्या महणण्यानुसार, नवीन निओ ड्राइव्ह आणि ई-सीएनजी तंत्रज्ञानामुळे गाडीचे (Vehicle) मायलेज अजून चांगले देते. टोयोटाचा दावा आहे की, त्याचा पेट्रोलचा प्रकार 20.51 kmpl आणि CNG प्रकार 26.11 kmpl पर्यंत मायलेज देईल. ही कार पेट्रोल (निओ ड्राइव्ह) आणि सीएनजी या दोन्ही पर्यांयासह उपलब्ध असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com