Raksha Bandhan 2022 : श्रावण महिन्यात येणारा दुसरा सण अर्थात रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण बहिण-भावाच्या नात्याला साजरा करणारा आनंदाचा क्षण म्हणून ओळखला जातो. या दिवसामुळे बहिण भावाचे नाते आणखी घट्ट होते.
हे देखील पहा -
यंदा रक्षाबंधन हा सण ११ ऑगस्ट २०२२ या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. 'रक्षा' या शब्दाचा अर्थ सुरक्षितता आणि 'बंधन' म्हणजे बंध, जो भावाने आपल्या बहिणीसोबत शेअर केलेल्या प्रेम आणि काळजीच्या घट्ट बंधनाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा सण राखी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. बहिणीने तिच्या भावाच्या मनगटावर ‘राखी’ नावाचा धागा बांधून साजरा केला जातो. हा धागा त्यांच्या एकमेकांबद्दलचे प्रेम, आपुलकी, काळजी, आदर आणि आराधना यांचे प्रतीक आहे.
तारीख आणि वेळ
हिंदू पंचागानुसार श्रावण (Shravan) महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. या वर्षी हा ११ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी सुरू होईल व १२ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी संपेल
रक्षाबंधनाचे महत्व
धार्मिक मान्यतेनुसार राखी (Rakhi) बांधल्याने घरात समृद्धी येते. काही मुली भगवान कृष्णाला राखी बांधतात आणि त्यांना भावाप्रमाणे त्यांचे रक्षण करण्याची प्रार्थना करतात. केवळ कुटुंबातच नाही तर हा सण चुलत भाऊ किंवा दूरच्या कुटुंबातील सदस्यांमध्येही साजरा केला जातो. सण नेहमीच सुरक्षितता आणि संरक्षणाच्या भावनेशी जोडला गेला आहे.
रक्षाबंधनाचा इतिहास
हिंदू धार्मिकतेनुसार प्रत्येक सणाच्या मागे काही विशिष्ट पौराणिक कथा आहेत. द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाने चुकून सुदर्शन चक्रावर आपले बोट कापले. राजकन्या द्रौपदीने रक्त येऊ नये म्हणून आपल्या साडीचा कापड फाडून त्या ठिकाणी बांधला. भगवान कृष्ण तिच्या हावभावाने खूप प्रभावित झाले आणि जगातील सर्व वाईटांपासून तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. त्यावेळी त्यांनी त्याला रक्षासूत्र असे म्हटले आहे. हे बंधन आणि संरक्षणाचे वचन नंतर महाभारत वस्त्रहरण प्रकरणामध्ये दिसून आले, ज्यामध्ये कौरवांनी द्रौपदीला सर्वांसमोर लाजविण्याचा प्रयत्न केला. भगवान कृष्णाने आपला शब्द पाळला आणि तिला अपमानापासून वाचवून तिचे रक्षण केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.