Raksha Bandhan Special : रक्षाबंधननिमित्त बहिणीला द्या हे खास गिफ्ट, होईल तुमचे नाते अधिक दृढ

या रक्षाबंधनच्या दिवशी बहिणाला द्या हे गिफ्ट
Raksha Bandhan Special
Raksha Bandhan Specialब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raksha Bandhan Special : यंदा रक्षाबंधन ११ ऑगस्टला आहे. यावेळी बहीण भावाला राखी बांधून प्रेम दाखवते, तर भाऊदेखील आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. यासोबतच भावा-बहिणींना भेटवस्तूही दिल्या जातात.

हे देखील पहा -

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या (Brother) प्रेमाचे बंधन. श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. हा दिवस बहिण (Sister) भावाचा सण म्हणून ओळखला जातो. खरे तर मुलींना काय गिफ्ट द्यावे हा प्रश्न सामान्य जरी असला तरी यामुळे डोकेदुखी होते. प्रत्येक भावाला हा प्रश्न पडत असेल आपल्या लाडक्या बहीणीला नेमके काय द्यायला हवे ? आज आम्ही तुम्हाला अशा काही गिफ्ट्सच्या आयडिया सांगणार होतो ज्यामुळे तुमच्या बहिणीच्या ओठांवर हसू उमटेल.

१. बहिणीच्या उच्च शिक्षणाचे प्रायोजक आणि समर्थन करा. या रक्षाबंधनाला तिला उच्च शिक्षण प्रायोजित करण्याचे वचन द्या. तिला फोटोग्राफी, पर्वतारोहण किंवा इतर करिअर निवडी शिकायच्या असतील तर तिला पाठिंबा द्या आणि प्रोत्साहन द्या. तिला करिअर निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करा.

Raksha Bandhan Special
Friendship Day 2022 in India : मैत्रीदिन ऑगस्टच्या पहिल्या रविवारी का साजरा केला जातो ?

२. आपण आपल्या बहिणीला घड्याळ गिफ्ट करु शकतो. सध्या बाजारात ट्रेंडनुसार अनेक नवनवीन घड्याळे बाजारात मिळतात. त्यापैकी फिटनेस फ्रीकचे स्मार्टवॉच आपण त्यांना गिफ्ट करु शकतो.

३. आपण आपल्या बहिणीला स्वत:च्या हाताने बनवलेले रंगीबेरंगी बास्केट बनवून देऊ शकतो. त्यात चॉकलेट व डायफ्रूट्स देखील घालून त्यांना देऊ शकतो. तसेच परफ्यूम किंवा ज्वेलरी देखील गिफ्ट करु शकतो.

४. आपण आपल्या बहिणीला केअर पॅकेज देऊ शकतो. त्यात आपण तिला वैयक्तिक ग्रूमिंग आयटम तसेच काही ऑनलाइन गिफ्ट व्हाउचर, मोबाइल धारक, की चेन आणि पर्स इत्यादींचा समावेश करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com