World No-Tobacco Day 2023 : अचानक सिगारेट सोडताय ? शरीरात होतात हे बदल, जाणून घ्या सविस्तर

World No-Tobacco Day : सिगारेट ओढणे शरीरासाठी हानिकारक असते यामुळे आपले यामुळे आपले फुफ्फुसे सहित संपूर्ण शरीर वर वाईट परिणाम होतो.
World No-Tobacco Day 2023
World No-Tobacco Day 2023Saam Tv

International No-Tobacco Day : तंबाखू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. तंबाखू आणि त्यापासून बनविलेले पदार्थ वापरल्याने कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तंबाखू ही महामारीसारखी आहे, सिगारेट ओढणे शरीरासाठी हानिकारक असते यामुळे आपले यामुळे आपले फुफ्फुसे सहित संपूर्ण शरीर वर वाईट परिणाम होतो.

सिगारेट ओढणाऱ्या लोकांना (People) अनेकदा धूम्रपान करू नये असा सल्ला दिला जातो. धूम्रपान करणे जरी चुकीचे असले तरी ही सवय लवकर सुटत नाही. अनेकांना सिगारेट सुटण्याची लत जात नाही. सिगारेटची तलब लागण्यावर माणूस बैचेन होतो. अनेकदा अनेक लोक सिगारेट सोडण्याचे संकल्प करतात परंतु हा संकल्प काही दिवसावर तुटून जातो खूप कमी जण असे आहेत की इच्छा संकल्प करूनच सिगारेट सोडण्याची मनामध्ये इच्छा व्यक्त करत असतात.

World No-Tobacco Day 2023
World No Smoking Day : निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली ! या गोष्टींची काळजी घेतल्यास धुम्रपानला घालता येईल आळा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी 8 दशलक्षाहून अधिक लोक तंबाखूमुळे मरतात. यापैकी 12 लाख लोकांचा मृत्यू सेकंड हँड स्मोकमुळे होतो. तंबाखू आरोग्यासाठी प्रत्येक प्रकारात हानिकारक आहे.

जगात तंबाखूचा सर्वाधिक वापर सिगारेटच्या स्वरूपात केला जातो. सिगारेट हे सर्वात जास्त वापरले जाणारे तंबाखू उत्पादन आहे. आज जागतिक (World) तंबाखू विरोधी दिनानिमित्त सिगारेट सोडल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात

सिगारेटमध्ये तंबाखूचे प्रमाण जास्त असते. यामुळे कर्करोग, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार यासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. धुम्रपान करणाऱ्यांशिवाय आजूबाजूच्या लोकांनाही सिगारेट ओढण्याचा वाईट परिणाम होतो.

World No-Tobacco Day 2023
Smoking Side Effects : फक्त सिगारेटच नाही तर त्याचा धूरही ठरु शकतो घातक !

सिगारेटमध्ये निकोटीन असते. निकोटीन हे उत्तेजक औषध आहे. सर्व तंबाखूजन्य पदार्थांमध्ये निकोटीन आढळते आणि ते व्यसनाचा बळी बनते. सिगारेट ओढल्याने शरीराला निकोटीनची सवय होते. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात, ज्याचा मेंदू आणि शरीरावर चांगला परिणाम होतो. यामुळे सिगारेट (Cigarette) ओढणाऱ्यांना बरे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते धोकादायक असते. सिगारेटच्या पॅकमध्ये सुमारे 22 मिलीग्राम ते 36 मिलीग्राम निकोटीन आढळते.

अचानक धूम्रपान सोडल्यास काय होईल?

डॉ.सोनिया रावत सांगतात की, सिगारेट ओढल्याने शरीराला निकोटीनचे व्यसन लागते आणि अचानक सिगारेट सोडल्याने काही समस्या निर्माण होतात. शरीराला निकोटीनची तल्लफ असते आणि लोकांना कोणतेही काम करावेसे वाटत नाही.

World No-Tobacco Day 2023
Effects of smoking on diabetes : मधुमेहींनो, सतत धूम्रपान करण्याची सवय आहे ? होऊ शकतात 5 गंभीर आजार !

सिगारेट सोडल्यामुळे लोकांना अस्वस्थता, झोपेमध्ये अडचण, चिडचिड, चिंता, जास्त भूक आणि वजन वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. तथापि, सिगारेट सोडल्यानंतर 2 ते 4 आठवड्यांत अशा समस्या पूर्णपणे दूर होतात. सिगारेट सोडणे लोकांसाठी कठीण आहे, परंतु असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो आणि शरीर मजबूत होते.

जाणून घ्या सिगारेट सोडण्याचे फायदे -

- सिगारेट सोडल्याने आरोग्य सुधारते आणि जीवनाचा दर्जा वाढतो.

- अकाली मृत्यूचा धोका कमी असतो, आयुर्मान 10 वर्षांनी वाढू शकते.

- हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग आणि फुफ्फुसाच्या आजाराचा धोका कमी होतो.

- कोरोनाने उत्पन झालेले हृदयरोग किंवा जुनाट फुफ्फुसाच्या आजाराच्या रुग्णांना आराम मिळतो.

- गर्भवती महिला आणि न जन्मलेल्या बाळाचे आरोग्य चांगले राहू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com