French Fries Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा फ्रेंच फ्राईज; नोट करा परफेक्ट रेसिपी

Sabudana French Fries Recipe: फ्रेंच फ्राईज हा पदार्थ सर्वांना आवडतो. म्हणून आज तुम्हाला घरच्या घरी बनणाऱ्या साबुदाणा फ्रेंच फ्राईजची रेसिपी सांगणार आहोत.
French Fries Recipe
French Fries Recipeyandex
Published On

आपण अनेकदा बाहेरचे पदार्थ खात असतो. बाहेरचे पदार्थ लहनांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. याबरोबर तुम्ही अनेकदा बटाट्याचे फ्रेंच फ्राईज खाल्ले असतील. फ्राईज हा पदार्थ सगळ्यांचा आवडीचा आहे. पण तुम्ही कधी घरच्या घरी साबुदाणा फ्रेंच फ्राईज ट्राय केले नसतील. तुम्ही घरी सुद्धा सोप्या पद्धतीने फ्राईज बनवू शकतात. साबुदाणा फ्राईज रेसिपी अगदी सोपी आहे. हे फ्राईज बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाहीये. जाणून घ्या रेसिपी.

French Fries Recipe
Tiffin Recipes : लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केळीपासून 'हा' खास पदार्थ

साहित्य

साबुदाणा

बटाटे

जिरे

हिरव्या मिरच्या

कोथिंबीर

काळी मिरी

लाल मिरची

शेंगदाणा कूट

मीठ

तेल इत्यादी.

बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम आवश्यकतेनुसार साबुदाणे घ्या. त्यानंतर साबुदाण्यांना मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करुन घ्या. यानंतर साबुदाण्याच्या पावडरला एका बाउलमध्ये काढून घ्या.

बाउलमध्ये असलेल्या साबुदाणा पावडरमध्ये जिरे पावडर, शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या लाल मिरच्या ,काळी मिरी पावडर ,मीठ टाका.

यानंतर बटाटे घ्या. त्यानंतर त्यांची साले काढून त्यांना बारीक किसून घ्या. बटाट्याच्या किसला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर या सर्व मिश्रणात बटाट्याचे किस टाका. यानंतर त्यांची चांगली कणीक मळून गोळा तयार करुन घ्या.

French Fries Recipe
Nankhatai Recipe : दिवाळी स्पेशल खुसखुशीत नानकटाई; 'या' टीप्सने बनवाल तर घरात सगळे कौतुक करतील

यानंतर बटर पेपर घ्या. या वर हे सर्व मिश्रण हाताच्या साहाय्याने पसरवून घ्या. पसरवलेल्या मिश्रणाला सुरीच्या साहाय्याने कापून हवा तसा लांब फ्राईजचा आकार द्या. यानंतर दुसरीकडे गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. मग त्यात तेल टाकून तेल थोडावेळ गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात साबुदाणा फ्रेंच फ्राईज टाका आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे आपले गरमागरम साबुदाणा फ्रेंच फ्राईज तयार झाले आहेत. तुम्ही साबुदाणा फ्रेंच फ्राईजला सॅाससोबत सर्व्ह करु शकता.

French Fries Recipe
Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com