Maharashtra Fort : महाराष्ट्रातील अनोखा किल्ला! ज्याचा आकार आहे चक्क विंचवाच्या शेपटीसारखा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Vinchukata Fort : महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याची एक वेगळी गोष्ट आहे. किल्ल्याला वेगळा आकार आणि स्वरूप आहे. महाराष्ट्रात असाच एक किल्ला वसलेला आहे, ज्याचा आकार विंचवाच्या शेपटीसारखा आहे.
Vinchukata Fort
Maharashtra Fort AI PHOTO
Published On: 
Summary

सह्याद्रीच्या कुशीत दडलाय विंचवाच्या आकाराचा किल्ला

हिवाळ्यात हिरव्यागार डोंगररांगा आणि धुक्यामुळे किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलते.

इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण किल्ले आहेत. यापैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला. या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यावरील 'विंचूकाटा' हा भाग. नावाप्रमाणेच या किल्ल्याचा हा डोंगररांगेसारखा पसरलेला भाग विंचवाच्या वळलेल्या शेपटीसारखा दिसतो. लांबवर पसरलेली तटबंदी, डोंगराचा अरुंद सुळका आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून पर्यटक थक्क होतात.

लोहगड किल्ला नेमका कुठे आहे?

लोहगड किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात, लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १,०३३ मीटर म्हणजेच ३,३८९ फूट उंचीवर हा किल्ला आहे. इंद्रायणी आणि पवना नदीच्या खोऱ्यांमधील भौगोलिक भागावर त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. लोहगडाच्या पूर्वेला विसापूर किल्ला आहे. हे दोन्ही किल्ले जवळच्या डोंगररांगांमध्ये असल्यामुळे त्यांना जोडगोळीचे किल्ले असेही म्हटले जाते. लोहगड किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे.

विंचूकाटा

लोहगड किल्ल्याचे सर्वात खास आकर्षण म्हणजे विंचूकाटा. किल्ल्याच्या मुख्य भागापासून पश्चिमेकडे लांब आणि अरुंद स्वरूपात बाहेर आलेली डोंगराची सोंड आणि त्यावरील तटबंदी विंचवाच्या वळलेल्या शेपटीसारखी दिसते. त्यामुळे या भागाला विंचूकाटा किंवा विंचूकडा असे नाव पडले. हा भाग साधारण १.५ किलोमीटर लांबीचा आहे. या ठिकाणी उभे राहिल्यावर आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, खोल दऱ्या आणि निसर्गाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. विशेष म्हणजे या भागाची रचना केवळ सौंदर्यासाठी नसून संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची होती. येथून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि किल्ल्याच्या संरक्षणासाठी उपयोग करणे शक्य होते.

लोहगड किल्ल्यावरील चार प्रमुख दरवाजे

  • गणेश दरवाजा: किल्ल्याच्या प्रवेशमार्गावरील महत्त्वाचा दरवाजा.

  • नारायण दरवाजा: ऐतिहासिक वास्तुकलेचे वैशिष्ट्य दाखवणारा दरवाजा.

  • हनुमान दरवाजा: किल्ल्याच्या प्रवेशरचनेतील महत्त्वाचा भाग.

  • महा दरवाजा: किल्ल्याच्या भक्कम संरक्षणव्यवस्थेची साक्ष देणारा दरवाजा.

Vinchukata Fort
Hidden Forts : हिवाळ्यात फिरायचंय? सह्याद्रीच्या कुशीत लपलेले 'हे' १० सुंदर किल्ले ठरतील खास, मित्रांसोबत करा भटकंती

लोहगड किल्ल्यावर कसे अन् कधी जावे?

लोहगड किल्ल्याजवळ मळवली हे रेल्वे स्थानक आहे. तेथून पुढे रस्त्याने किंवा पायी किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते.पुण्याहून लोणावळा मार्गे लोहगडवाडीपर्यंत जाता येते. मुंबईहून लोणावळा आणि मळवलीमार्गे किल्ल्यावर पोहोचता येते. लोहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असल्यामुळे ट्रेकिंग आणि किल्ला पाहण्याचा आनंद घेता येतो.

टीप : वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.