Pune Fort : किल्ल्याचा 'हा' भाग दिसतो अगदी विंचवाच्या शेपटीसारखा, मुंबईजवळच आहे युनिक लोकेशन

Shreya Maskar

पुण्याचा किल्ला

महाराष्ट्रातील पुण्यात लोणावळ्याजवळ ऐतिहासिक लोहगड किल्ला वसलेला आहे. हा डोंगरावरील किल्ला आहे. लोहगड समुद्रसपाटीपासून १,०३३ मीटर (३,३८९ फूट) उंचीवर आहे.

Pune Fort | google

लोहगड किल्ला

लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगचा थरार अनुभवता येते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटकांची येथे गर्दी पाहायला मिळते. या किल्ल्याला संरक्षक कठडे नसल्यामुळे येथील ट्रेक थरारक वाटतो.

Lohgad Fort | google

पावसाळी वातावरण

ओले शेवाळ, मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी करणारा दाट धुक्यामुळे दगडांच्या पायऱ्या आणि मातीचे मार्ग अत्यंत निसरडे होतात.

Rainy weather | google

संरक्षक कठड्यांचा अभाव

अनेक उंच भाग, अरुंद वाटा आणि पायऱ्यांजवळ, जिथे खोल दरी आहे, तिथे संरक्षक कठडे किंवा कुंपण नाही. मोकळ्या खिंडींमध्ये वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे गिर्यारोहकांचा तोल जाऊ शकतो.

Lack of protective walls | google

विंचू कडा

विंचू कडा ही १,५०० मीटर लांब आणि अरुंद अशी तटबंदीयुक्त डोंगररांग आहे. 'विंचू काटा' म्हणजे गडाचा पश्चिमेकडे लांब गेलेला, विंचवाच्या नांगीसारखा किंवा शेपटीसारखा दिसणारा एक अत्यंत अरुंद आणि टोकदार डोंगरकडा होय.

Scorpion Edge | google

कसं जावं?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून सुमारे १०० किमी गाडी चालवून किंवा मावळली स्थानकापर्यंत ट्रेनने जाऊन तुम्ही लोहगड किल्ल्यावर पोहोचू शकता.

how to go | google

नाव

लोहगड किल्ल्याला लोखंडाचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हे नाव त्याच्या जबरदस्त सामर्थ्य आणि प्रचंड बचावात्मक संरचनांमुळे मिळाले.

name | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : इतिहास ते सह्याद्रीचा ३६०° नजारा...,मृगगडाबद्दल कधी ऐकलंय का?

Mrugagad Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...