Shreya Maskar
तुम्ही लहान मुलांसोबत आवर्जून इतिहासाची सफर करा. मुंबई आणि मुंबईजवळ लपलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची मुलांना ओळख करून द्या.
मृगगड हा रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरावरील किल्ला आहे. येथे छोटा ट्रेक प्लान करता येतो. मृगगड सुधागड तालुक्यात, रायगड जिल्ह्यात आणि भेलीव गावाजवळ आहे.
मृगगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १,७५० फूट इतकी आहे. खडकात कोरलेल्या तीव्र उताराच्या पायऱ्या आणि उंबरखिंड येथील ऐतिहासिक लढाईसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
मृगगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक लष्करी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी एका मोक्याच्या पहारेकऱ्याच्या ठिकाणासारखा (वॉचटावर) वापरला जात असे.
खडकात कोरलेल्या अरुंद पायऱ्या आणि कड्याच्या टोकाजवळ खडकात कोरलेल्या लहान गुहा आहेत. वास्तुकलेचा हा सुंदर नजारा पाहून तुमचे मन हरवून जाईल.
पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगा, दाट हिरवीगार जंगले आणि हंगामी धबधबे यांचे ३६०-अंशांचे विहंगम दृश्य येथून दिसते. मुंबई-पुण्याजवळचे हे कमी गर्दीचे ठिकाण आहे.
मृगगड किल्ल्यावर जाण्यासाठी खोपोली हे जवळचे स्टेशन आहे. खोपोलीला आल्यावर तुम्ही रिक्षाने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.