Monsoon Trekking Places: मान्सूनमध्ये ट्रेकिंगचा प्लॅन करताय? मग, मुंबई पुण्याजवळील 'या' ७ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Shruti Vilas Kadam

लोहगड किल्ला

लोनावळ्याजवळील लोहगड किल्ला नवशिक्यांसाठी सर्वोत्तम ट्रेक मानला जातो. दगडी पायऱ्या, हिरवाई आणि 'विंचूकाटा'वरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य मन मोहून टाकते.

Monsoon Trekking Places

राजमाची किल्ला

दाट जंगल, लहान ओढे आणि धुक्याने वेढलेला राजमाची किल्ला मान्सूनमध्ये अधिकच आकर्षक दिसतो. विकेंड ट्रेक आणि कॅम्पिंगसाठी हा उत्तम पर्याय आहे.

fort | google

विसापूर किल्ला

लोहगडच्या शेजारी असलेला विसापूर किल्ला पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. विस्तीर्ण पठार आणि निसर्गरम्य दृश्य ट्रेकचा आनंद वाढवतात.

fort | google

कोरीगड किल्ला

सोपा ट्रेक, ऐतिहासिक तटबंदी आणि किल्ल्यावरील तलावामुळे कोरीगड पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील हिरवाई विशेष मोहक दिसते.

Fort | google

तिकोना किल्ला

त्रिकोणी आकारासाठी प्रसिद्ध असलेला तिकोना किल्ला साहसी ट्रेकर्ससाठी उत्तम आहे. माथ्यावरून पवना धरण आणि सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

Fort | Google

हरिश्चंद्रगड किल्ला

सह्याद्रीतील सर्वात लोकप्रिय ट्रेकपैकी एक. कोकणकडा, तारामती शिखर आणि ढगांनी वेढलेले निसर्गरम्य दृश्य पावसाळ्यात अधिकच मोहक दिसते. हा ट्रेक मध्यम ते अवघड श्रेणीतील असल्याने अनुभवी ट्रेकर्ससाठी योग्य आहे.

Fort | google

प्रबळगड (कलावंतीण दुर्ग)

पनवेलजवळील हा किल्ला साहसी ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे. कलावंतीण दुर्गाकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या आणि माथ्यावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात येथे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण मार्ग घसरणारा असू शकतो.

fort | yandex

Tandoori Roti Recipe: रोज भाजीसोबत चपाती खाऊन कंटाळा आलायं? मग तव्यावर बनवा हॉटेलसारखी तंदुरी रोटी; वाचा रेसिपी

Tandoori Roti Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा