Tandoori Roti Recipe: रोज भाजीसोबत चपाती खाऊन कंटाळा आलायं? मग तव्यावर बनवा हॉटेलसारखी तंदुरी रोटी; वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

२ कप गव्हाचे पीठ, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, आवश्यकतेनुसार कोमट पाणी आणि रोटीला पाणी लावण्यासाठी थोडे अतिरिक्त पाणी घ्या.

Tandoori Roti

पीठ मळा

पीठ, मीठ आणि तेल एकत्र करून कोमट पाण्याने मऊसर पीठ मळा. पीठ २० ते ३० मिनिटे झाकून ठेवा.

Tandoori Roti

गोळे तयार करा

पीठाचे समान आकाराचे गोळे करून त्यांना गोल किंवा अंडाकृती आकारात मध्यम जाडीची रोटी लाटा.

Tandoori Roti

रोटीला पाणी लावा

रोटीच्या एका बाजूला हलक्या हाताने पाणी लावा. यामुळे रोटी तव्याला व्यवस्थित चिकटते.

Tandoori Roti

तव्यावर भाजा

गरम लोखंडी तव्यावर पाणी लावलेली बाजू खाली ठेवून रोटी चिकटवा. काही सेकंदांनी तवा उलटा करून थेट गॅसच्या आचेवर रोटी भाजा.

Tandoori Roti

सोनेरी डाग येईपर्यंत शेकून घ्या

रोटीवर तंदुरीसारखे काळपट आणि सोनेरी डाग दिसू लागले की ती तव्यावरून अलगद काढा.

Tandoori Roti

बटर लावून सर्व्ह करा

गरमागरम तंदुरी रोटीवर बटर किंवा तूप लावा. पनीर, डाळ मखनी, छोले किंवा कोणत्याही मसालेदार भाजीसोबत सर्व्ह करा.

Tandoori Roti

Trendy One Piece Dress: पावसाळ्यात ट्राय करा हे 7 ट्रेंडी वन पीस डिझाईन्स; स्टाईलसोबत मिळेल कम्फर्टही

Monsoon Trendy One Piece Dress | Saam Tv
येथे क्लिक करा