Sandwich : भारतातील विविध भागातील चविष्ट असे सॅण्डविच, याची चव तर तुम्ही चाखली असेलच !

भारतातील निरनिराळ्या प्रकारचे सॅण्डविच
Sandwich
SandwichSaam TV

Sandwich : आरोग्यासाठी आणि चवीसाठी सॅण्डविचचे स्थान अव्वल आहे. स्वयंपाक घरात पटकन बनला जाणारा पदार्थ जर असेल तर तो सॅण्डविच. गरजेनुसार व आपल्याला आवडणाऱ्या चवीनुसार तो बनवता येतो. यात विविध प्रकार देखील येतात.

भारतात (India) अनेक प्रकारे सॅण्डविच बनवला जातो. त्याची बनवायाची व त्यात वापरले जाणारे पदार्थ हे अगदी वेगवेगळे आहेत. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वयंपाकाची शैली दाखवू शकतात. जाणून घेऊया भारतात मिळणारे विविध सॅण्डविच चे प्रकार

Sandwich
Navratri Fast Low Calorie Food : नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवासाचे 'हे' पदार्थ खा, राहाल फिट !

१. स्ट्रीट-स्टाईल बॉम्बे सॅण्डविच:

या सुपर टेस्टी बॉम्बे सॅण्डविचशिवाय मुंबईचे स्ट्रीट फूड अपूर्ण दिसते. बटाट्याचे (potatoes) तुकडे, काकडी, टोमॅटोचे तुकडे, कांदा आणि सिमला मिरचीच्या रिंग्सच्या स्वादिष्ट मिश्रणाने भरलेले हे सॅण्डविच एकूणच अप्रतिम आहे. तसेच, हिरवी चटणी आणि इतर मसाला वापरल्याने रेसिपीमध्ये भरपूर चव येते.

२. ब्रेड मलाई सॅण्डविच:

जर तुम्हाला नेहमीच्या सॅण्डविचच्या रेसिपीचा कंटाळा आला असेल, तर तुमच्या ट्रीटला एक मेकओव्हर देण्यासाठी ब्रेड मलाई सॅण्डविचमध्ये ब्रेडच्या स्लाइसवर लावल्या जाणार्‍या ताज्या क्रीमचा (दुधापासून)वापर करु शकतो. कोलकात्याच्या रस्त्यांवर हे पाहायला मिळते.

Sandwich
Navratri Special Recipe 2022 : नवरात्रीच्या उपवासात खा; 'हा' स्पेशल रायता, अपचनाची समस्या होईल दूर !

३. दही सॅण्डविच :

व्यस्त सकाळसाठी ही एक उत्तम कृती आहे, जेव्हा तुमच्याकडे नाश्ता बनवण्यासाठी वेळ नसतो. तेव्हा हा पर्याय उत्तम आहे. यासाठी फक्त काकडी, टोमॅटो, सिमला मिरची आणि कांदा या भाज्या चिरून घ्याव्या लागतील. चाट मसाला आणि दही घालून सर्वकाही चांगले मिसळा. ते सॅण्डविचच्या स्लाइसमध्ये ठेवा आणि तळून घ्या.

४. होममेड चिकन सॅण्डविच:

ज्यांना चिकनचे स्वादिष्ट पदार्थ खायला आवडतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. अतिरिक्त फायदा असा आहे की हे शिजवण्यासाठी तुम्हाला फक्त पंधरा मिनिटे लागतील. एक छान घरगुती चिकन सॅण्डविच तुमच्या नाश्त्याचा हिरो बनू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com