Poco C61 खरेदी करा १० हजार रुपयांत, 50 MP कॅमेरा, दमदार बॅटरी बॅकअपसह लवकरच येणार बाजारात

POCO C61 Smartphone Specification : POCO C61 फोन अगदी वाजवी दरात कंपनी विकणार आहे. हा फोन मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या POCO C51 च्या फोनची जागा घेईल असे कंपनीने म्हटले आहे.
POCO C61 Smartphone Specification
POCO C61 Smartphone SpecificationSaam tv
Published On

Poco C61 Smartphone Price:

येत्या महिन्यात तुम्ही मोबाइल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्वस्तात मस्त फोन खरेदी करु शकाल. POCO X6 Neo नुकताच भारतात लॉन्च झाला आहे. तर त्याचा आणखी एक स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होईल.

POCO C61 फोन अगदी वाजवी दरात कंपनी विकणार आहे. हा फोन मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या POCO C51 च्या फोनची (Smartphone) जागा घेईल असे कंपनीने म्हटले आहे. Poco चा हा स्मार्टफोन Redmi A3 चे रीब्रँडेड व्हर्जन असू शकते असे म्हटले जाते आहे. हा स्मार्टफोन भारतात पुढील महिन्यात लॉन्च होईल. फिचर्स आणि किंमत पाहूया.

Poco च्या या अल्ट्रा बजेट स्मार्टफोनची किंमत मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या Poco C51 च्या किमतीपेक्षा १० हजार रुपयांनी (Price) कमी असेल. हा स्मार्टफोन वर्तुळाकार रिंग कॅमेरासह येईल. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन दिले जाईल असे म्हटले जात आहे.

POCO C61 Smartphone Specification
Jio 749 And 1198 Rechage जिओचा जबरदस्त रिचार्ज! 20 GB डेटा,14 OTT, अनलिमिटेड कॉल्स आणि बरेच काही...

1. किंमत किती?

POCO C61 दोन स्टोरेजमध्ये मिळणार आहे. 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB मध्ये हा फोन ग्राहकांना मिळणार आहे. फोनची साधरणत: किंमत ७,४९९ रुपये इतकी असू शकते. याचा टॉप व्हेरिएंट ८,४९९ रुपयांना मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. याचे फीचर्स हे Redmi A3 सारखे असतील.

2. POCO C61 ची वैशिष्ट्ये

  • POCO C61 च्या स्मार्टफोनमध्ये ६.७१ इंचाचा HD + LCD डिस्प्ले मिळू शकते. यामध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट आणि ५०० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस मिळेल.

  • पोको स्मार्टफोनच्या डिस्पेलमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ मिळत आहे. ज्यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहिल. या फोनला साइडला फिंगरप्रिट सेन्सरही असणार आहे.

  • यामध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर दिला जाणार आहे. तसेच 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सपोर्ट मिळणार आहे.

  • पोकोच्या या फोनमध्ये मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 50 MP बॅक आणि 0.08 MP चा ड्युअल कॅमेरा मिळणार आहे. तसेच सेल्फी आणि वीडिओ कॉलिंगसाठी 5MP कॅमेराही देण्यात येणार आहे.

  • स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल विचार करायचा झाला तर 5000mAh दमदार बॅटरी यामध्ये मिळणार आहे. यात 10W USB Type C चार्जर मिळणार आहे. कनेक्टिविटीसाठी पोकोच्या फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, ड्युअल 4G सिम कार्ड सारखे फीचर्स मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com