Research On Tree: झाडे एकमेकांशी संवाद साधतात? एकमेकांना मदत देखील करतात? संशोधनातुन माहिती समोर

Plants Communicate With Each Other Tree Helps Each Other Research: झाडे एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांना मदत देखील करतात अशी संशोधनातुन माहिती समोर आलीय. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
झाडे एकमेकांशी संवाद साधतात
Research On TreeSaam Tv
Published On

मुंबई : तुम्हाला माहित आहे का, की झाडांचे स्वतःचे सोशल नेटवर्क आहे? आपल्यासारखेच त्यांचेही मित्र असतात. झाडे एकमेकांशी संवाद साधतात आणि गरजेच्या वेळी एकमेकांना मदतही करतात! नाही ना ऐकूण आश्चर्य वाटले ना? चला तर मग जाणून घेऊया.

तुम्हाला विशेष वाटेल परंतु शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. झाडांमध्ये मुळे आणि बुरशीची एक प्रणाली आहे जी त्यांना पोषक घटक आणि माहिती साठवण्यासाठी मदत करत असते. झाडांच्या या नेटवर्कला "वुड वाइड वेब" असे म्हणतात. झाडे साठवलेली माहिती इतर झाडांना देत असतात आणि एकमेकांची मदत करत असतात.

उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या झाडावर (Tree) कीटकांचा हल्ला होतो, तेव्हा ते शेजारच्या झाडांना धोक्याची सूचना देण्यासाठी या मुळांच्या माध्यमातून सिग्नल पाठवू शकतात. यामुळे त्यांना स्वत:चे संरक्षण करता येते . शिवाय ही मुळे कीटकांना संपुर्ण झाडावर पसरण्यापासून रोखते. झाडांमध्ये "मातृवृक्ष" देखील असतात जी लहान झाडांची काळजी घेण्याचे काम करत असतात. ही मातृवृक्ष लहान झाडांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात शिवाय पोषक वातावरण सुद्धा तयार करत असतात.

झाडांमधील हे अविश्वसनीय नेटवर्क आपल्या जंगलाची काळजी घेत असते. झाडांचा परस्परसंबंध समजून घेऊन, आपण या महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी काम करू शकतो.

झाडे एकमेकांशी संवाद साधतात
Banyan tree Benefits : एक दिवसच का ? आयुष्यभर घ्या वडाच्या झाडाचे औषधी फायदे !

संशोधनात असे समोर आले आहे की, (Research Article) झाडे सुगंधाद्वारे देखील संवाद साधू शकतात. जेव्हा झाडाला दुखापत होते किंवा कीटकांचा हल्ला होतो, तेव्हा ते हवेत रासायनिक सिग्नल सोडत असतात. जवळच्या झाडांना संभाव्य धोक्यांबद्दल चेतावणी देत असतात. झाडांची संसाधने वाटून घेण्याची एक अनोखी पद्धत आहे. झाडे आपल्याकडे असलेली पोषक घटके आणि पाणी शेजारच्या झाडांन देतात.

झाडांच्या या नेटवर्क व्यतिरिक्त झाडे त्यांच्या पाने आणि फांद्यांद्वारे देखील संवाद साधतात. ज्यामुळे ते आपली वाढ आणि विकास सुरळीत करू शकतात. झाडांच्या या संवादाचे परिणाम फार आहेत. झाडे एकत्रितपणे कशी कार्य करतात हे समजून घेऊन, आपण आपल्या गार्डनचे देखिल अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो आणि निरोगी इकोसिस्टमला प्रोत्साहन देऊ (Plant) शकतो. शिवायआपण या झाडांकडून सहकार्य आणि समर्थनाबद्दल मौल्यवान धडे देखील शिकू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्ही जंगलात फिरायला जात असाल तर लक्षात ठेवा, की तुमच्या आजूबाजूची झाडे ही केवळ स्थिर वस्तू नाही तर त्यापेक्षा खुप काही जास्त आहेत, ते जिवंत आहेत, श्वास घेणारे आहेत जे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकत्र काम करत आहेत.

झाडे एकमेकांशी संवाद साधतात
Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com