Pithori Amavasya 2023 : पिठोरी अमावस्येला करा हे उपाय, मिळेल बक्कळ पैसा...

Pithori Amavasya Tithi 2023 : हिंदू पंचागानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते.
Pithori Amavasya 2023
Pithori Amavasya 2023Pithori Amavasya 2023 Puja
Published On

पिठोरी अमावस्या तारीख:

हिंदू पंचागानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदा ही अमावस्या १४ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी पितृ तर्पण केले जाते. तसेच याला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. यादिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो.

पिठोरी अमावस्येला उपावासही केला जातो. पितृ तर्पणासोबत हा दिवस धनदेवतेच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी आहे.

Pithori Amavasya 2023
Pithori Amavasya And Bail Pola 2023 : पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा सण कधी? जाणून घ्या पूजा पद्धत, तिथी आणि महत्त्व

1. अमावस्या तिथी

श्रावणी (Shravan) पिठोरी अमावस्या गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल तर समाप्ती शुक्रवारी १५ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी होईल.

Pithori Amavasya 2023
Weight Loss Food : आठवड्याभरात वजन होईल झटक्यात कमी, डाएटमध्ये समावेश करा स्वयंपाकघरातील हे पदार्थ

2. पिठोरी अमावस्येला करा हे उपाय

  • अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घराची (Home) साफसफाई करा.

  • या दिवशी घरात कोणताही कचरा ठेवू नका. या दिवशी घरात अंधार नसायला हवा.

  • या उपायाने तुमच्या घरात कधीही पैशाची (Money) कमतरता भासणार नाही.

3. पितरांना कसे कराल प्रसन्न?

पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान करावे. जर तुम्हाला या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करता येत नसेल तर तुमच्या मृत पूर्वजांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला वस्त्र, पैसा आणि अन्न दान करा. असे केल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Pithori Amavasya 2023
Ganesh Chaturthi 2023 Puja List : गणेश पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? पाहा लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com