Lasun Chivda Recipe : सकाळच्या चहाबरोबर कुरकुरीत लसूण चिवडा; रेसिपी माहितीये का?

Lasun Chivda With Tea : घरच्याघरी नाश्त्यासाठी लसूण चिवडा कसा बनवायचा याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Lasun Chivda With Tea
Lasun Chivda RecipeSaam TV
Published On

सकळी रोज नाश्त्याला काय बनवावे असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला असतो. त्यामुळे बरेच जण सकाळच्या नाश्त्याला चहा बनवतात. चहाबरोबर काहीतरी गोड किंवा मग तिखट कुरकुरीत खावंस प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी खमंग लसूण चिवड्याची रेसिपी आणली आहे. ही रेसिपी अगदी सिंपल आणि सोपी असून झटपट तयार होते.

Lasun Chivda With Tea
Tasty Tiffin Box Recipes : लहान मुलांना टिफीनमध्ये द्या चमचमीत अन् पोष्टिक पदार्थ, डबा होईल रिकामा!

कृती

सर्वात आधी लसूण, हळद आणि तूप एकत्र मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या. पुढे एका वाटीत बेसन पीठ, तांदूळ पीठ सुद्धा मिक्स करा. त्यानंतर यात तयार मसाला टाका आणि एकत्र मिक्स करून घ्या. तसेच पुढे मीठ मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी टाकून याची छान कणीक मळून घ्या.

कणीक मळून झाल्यावर हे पीठ एका साचात भारून बारीक शेव पाडून घ्या. तसेच शेव मंद आंचेवर तळून घ्या. त्यानंतर शेंगदाणे आणि चणा डाळ तळून त्यावर थोडं लाल तिखट टाका. तसेच यामध्ये कडीपत्ता सुद्धा तळून घ्या. शेवटी शेव आणि अन्य सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. तयार झाला झटपट लसूण चिवडा.

Lasun Chivda With Tea
Left Over Rice Recipe : मुलं पिझ्झा-बर्गर खाणं विसरून जातील; घरच्याघरी रात्री उरलेल्या पदार्थांपासून बनवा ही यम्मी रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com