ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लसून आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. लसून खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते.
लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी ॲलिसिन सारखे गुणधर्म आढळतात ज्यामुळे शरीराला फायदे होतात.
परंतु, जास्त प्रमाणात लसून खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
गरजेपेक्षा जास्त प्रमाणात लसून खाल्ल्यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते.
जास्त प्रमाणात लसणाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
जास्त प्रमाणात लसून खाल्ल्यामुळे शरीरात अशक्तपणा येण्याची शक्यता आहे.
लसणाचे अतिसेवन केल्यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.