Blood group: हा रक्तगट असेल तर सावधान; वयाच्या ६० पूर्वी 'या' व्यक्तींना असतो स्ट्रोकचा धोका दुप्पट

Blood type A double stroke risk: आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित धोक्यांशिवाय, तुमचा रक्तगट (Blood Group) देखील काही गंभीर आजारांचा धोका दर्शवू शकतो. अलीकडेच झालेल्या एका मोठ्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Blood type A double stroke risk
Blood type A double stroke risksaam tv
Published On
Summary
  • रक्तगट A1 असल्यास स्ट्रोकचा धोका वाढतो

  • ६० वर्षांपूर्वी स्ट्रोक होण्याची शक्यता १६% जास्त

  • १७,००० स्ट्रोक रुग्णांचा अभ्यास करण्यात आला

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून ब्लड ग्रुप आणि तरुण वयात होणाऱ्या स्ट्रोकच्या जोखमीमध्ये थेट संबंध आढळल्याचं समोर आलं आहे. ही महत्त्वाची माहिती ‘न्यूरोलॉजी’ या प्रसिद्ध वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली असून यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांना स्ट्रोकचा धोका असलेल्या व्यक्तींना ओळखणं आणि योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं अधिक सोपं होऊ शकतं.

या अभ्यासातून काय समोर आलं?

या अभ्यासात 18 ते 59 वयोगटातील सुमारे 17,000 स्ट्रोकचं रुग्ण आणि 6 लाख स्ट्रोक न झालेल्या लोकांचे डेटा तपासण्यात आले. विश्लेषणातून असं स्पष्ट झालं की, ज्यांचा रक्तगट A असून त्यातील A1 हा उपप्रकार असलेल्या लोकांना इतर रक्तगटांच्या तुलनेत 60 वर्षांपूर्वी स्ट्रोक होण्याचा धोका 16% अधिक होता. म्हणजेच काही रक्तगट विशेषतः A1 असलेल्या व्यक्तींमध्ये मेंदूला स्ट्रोक येण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढू शकते.

Blood type A double stroke risk
Piles pain relief: आता 5 मिनिटांत पाईल्सच्या वेदनांपासून होईल मुक्तता; डॉक्टरांनी सांगितला एक उत्तम आणि सोपा उपाय

आजच्या काळात तरुणांमध्ये लवकर वयात स्ट्रोक होण्याच्या घटना वाढतायत. त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. जे या आजारातून वाचतात त्यापैकी अनेकांना आयुष्यभर अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो. तर काहींचा मृत्यूही अकाली होऊ शकतो. धक्कादायक बाब म्हणजे घटनामध्ये वाढ होत असली तरी तरुणांमध्ये स्ट्रोक का होतो यावर पुरेसं संशोधन झालेलं नाही.

तज्ज्ञांनी काय मांडलं मत?

या अभ्यासात शास्त्रज्ञांनी संपूर्ण जनुक पातळीवरील विश्लेषण करून स्ट्रोकशी संबंधित आनुवंशिक घटक शोधले. त्यातून दोन महत्त्वाचं अनुवांशिक भाग ओळखले गेले, ज्यापैकी एक रक्तगटाशी संबंधित होता. अधिक तपास केल्यावर रक्तगट A मधील A1 उपगटाचा लवकर वयात स्ट्रोकशी थेट संबंध असल्याचं दिसून आलं.

हे नेमकं का घडतं याची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध नसली तरी रक्त गोठण्याची प्रक्रिया, शरीरातील जैविक बदल किंवा इतर यंत्रणा यामागे कारणीभूत असू शकतात, असं तज्ञांचे मत आहे.

या अभ्यासाचे सह-प्रमुख संशोधक आणि यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोलॉजीचे प्राध्यापक डॉ. स्टीव्हन जे. किटनर म्हणाले, “कमी वयात स्ट्रोक होणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय. हे लोक जीवावर बेतणाऱ्या या घटनेतून जगले तरी त्यांना वर्षानुवर्ष अपंगत्व सहन करावं लागू शकतं. तरीही अशा स्ट्रोक्सच्या कारणांवर फार कमी संशोधन झालं आहे.”

Blood type A double stroke risk
Sleep needs by age: वयाप्रमाणे झोपेची आवश्यकता बदलते; तुमच्या वयानुसार झोपण्याची योग्य वेळ कोणती?

संशोधकांचं म्हणणं आहे की, रक्तगटासारखे अनुवांशिक घटक किंवा कुटुंबात स्ट्रोकचा इतिहास असणं यासारख्या गोष्टी माहिती असणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीचा रक्तगट A1 असल्याचं माहीत असेल तर त्याने आरोग्य तपासणी नियमित करणं, जीवनशैली आरोग्यदायी ठेवणं आणि स्ट्रोकची लक्षणं ओळखणं यावर विशेष लक्ष द्यावं.

अहवालात असंही म्हटलंय की, अनुवांशिकता, विशेषतः रक्तगट, स्ट्रोकच्या जोखमीतील एक महत्त्वाचा घटक मानला जाऊ शकतो. संशोधकांना आशा आहे की, या माहितीच्या आधारे भविष्यात तरुण लोकांसाठी स्ट्रोक होण्याची शक्यता अधिक अचूकपणे ओळखणं आणि योग्य वेळी त्याची पूर्वतयारी करणं शक्य होईल.

Blood type A double stroke risk
Most Dangerous River: भारतातील सर्वात धोकादायक नदी कोणती माहित आहे का?

संशोधनातून काय स्पष्ट होतंय?

या संशोधनातून स्पष्ट होतं की, फक्त जीवनशैली नव्हे, तर आपले रक्तगट आणि अनुवांशिक रचना देखील स्ट्रोकच्या धोक्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे स्वतःची आनुवंशिक माहिती जाणून घेणं ही काळाची गरज बनली आहे.

Blood type A double stroke risk
Lack of sleep: नीट झोप होत नाही! आरोग्यासाठी ठरतेय सर्वात घातक, संशोधनातून समोर आली झोप उडवणारी माहिती
Q

कोणत्या रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त?

A

रक्तगट A1 असलेल्यांना धोका जास्त असतो.

Q

A1 रक्तगटाच्या लोकांमध्ये धोका किती टक्के जास्त?

A

१६% अधिक स्ट्रोकचा धोका असतो.

Q

हा अभ्यास कोठे प्रकाशित झाला?

A

‘न्यूरोलॉजी’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला

Q

तरुणांमध्ये स्ट्रोक का वाढत आहे?

A

अनुवांशिक कारणे आणि जीवनशैलीमुळे वाढत आहे.

Q

A1 रक्तगट असल्यास काय करावे?

A

नियमित तपासणी आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com