Dhanshri Shintre
भारतभर विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये २०० पेक्षा जास्त लहान-मोठ्या नद्या आपल्या प्रवाहात वाहत असतात.
या नद्यांपैकी अनेक नद्या धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानल्या जातात आणि भक्तीभावाने पूजल्या जातात.
इतकंच नाही तर भारतात अनेक नद्या पूजनीय मानल्या जातात आणि त्यांची विधीपूर्वक पूजा देखील केली जाते.
काही नद्या मात्र अशा आहेत ज्या शापित मानल्या जातात आणि त्यांना अतिशय धोकादायकही समजलं जातं.
आज आपण अशा एका नदीबद्दल जाणून घेणार आहोत जिला सर्वाधिक भयावह नदी मानले जाते.
ही नदी गुजरातमधील वडोदरा शहरात आहे आणि तिचं नाव 'विश्वामित्री नदी' असून ती अत्यंत भयावह मानली जाते.
म्हणलं जातं की ही नदी म्हणजे मगरींसाठी एक सुरक्षित निवासस्थान असून त्यांना येथे भरपूर प्रमाणात आढळून येतात.
याच कारणामुळे बहुतांश लोक या नदीच्या आसपास जाणं टाळतात आणि तिच्यापासून सुरक्षित अंतर राखतात.