

लक्षणांवरून जरी आजाराच्या चिकित्सेसाठी उपयुक्त असे अनेक धागेदोरे सापडत असले तरीही त्यांचं निश्चित निदान मात्र लॅबोरेटरीतील चाचण्याच पुरवू शकतात. पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम आणि थायरॉइड समस्यांसारख्या हॉर्मोन्स संबंधित तक्रांरीमध्ये ही महत्त्वाची असते. दोन्ही समस्या स्त्रियांमध्ये सर्रास आढळून येतात, दोन्हींच्या बाबतीत काही एकसारखी लक्षणं आढळून येऊ शकतात आणि दोन्ही समस्या प्रजनन आणि चयापचय यंत्रणेच्या स्वास्थ्यावर लक्षणीय परिणाम करतात.
या दोन्ही स्थितींमागची मूळ कारणं परस्परांहून भिन्न आहेत. म्हणूनच या दोन स्थितींमधला फरक ओळखण्यामध्ये चाचण्या मध्यवर्ती भूमिका बजावतात.
मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या रिजनल लॅबप्रमुख डॉ. स्मिता हिरस सुडके यांनी सांगितलं की, पीसीओएस ही मूलत: अंडाशयातील अंत:स्त्रावी ग्रंथींशी निगडित समस्या आहे. प्रजननसंस्थेशी संबंधित हार्मोन्समध्ये असमतोल निर्माण होणं, विशेषत: अँड्रोजेन्सचं अतिरिक्त प्रमाण ही या समस्येची खूण आहे. पॉलिसिस्टीक ओव्हरीजविषयी अल्ट्रासाउंड चाचण्यांतून हाती येणाऱ्या निष्कर्षांवर बरेचदा चर्चा होत असली तरीही हे निदान निव्वळ इमेजिंगवर अवलंबून नसतं, तर त्यासाठी हॉर्मोन्सचं मूल्यमापन गरजेचं ठरतं.
टेस्टोस्टेरॉनची पातळी: PCOS असलेल्या अनेक महिलांमध्ये ही पातळी वाढलेली दिसते.
LH आणि FSH यांचं गुणोत्तर: LH/FSH गुणोत्तर जास्त असल्यास अनोव्हल्टरी सायकल्स असल्याचं सूचित होतं.
सेक्स हार्मोन-बाइंडिंग ग्लोब्युलिन (SHBG): याचे प्रमाण बरेचदा कमी होते, परिणामी अधिक मुक्त टेस्टेस्टेरॉन्सचे अभिसरण होते.
Anti-Müllerian हॉर्मोन (AMH): सामान्यत: वाढते, हे अंडाशयातील फॉलिकल्स वाढल्याचे चिन्ह असते.
इन्सुलिन प्रतिरोधाची चिन्हं: फास्टिंग ग्लुकोज आणि फास्टिंग इन्सुलिनमुळे पीसीओएसच्या चयापचयाशी निगडित बाजूचे मूल्यमापन करण्यास मदत होते.
थायरॉइड ग्रंथीमध्ये T3 आणि T4 हार्मोन्स निर्माण होतात, जे चयापचय, ऊर्जा संतुलन आणि वाढीचे नियमन करतात. जेव्हा थायरॉइड हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो.
थायरॉइड-स्टिम्युलेटिंग हार्मोन (TSH): ही प्राथमिक तपासणीसाठीची चाचणी आहे. TSH ची वाढलेली पातळी हायपोथायरॉइडिझमकडे निर्देश करते; तर TSH कमी असणे हायपरथायरॉइडचे लक्षण असते.
फ्री T3 and फ्री T4: या चाचणीद्वारे ग्रंथी कमी सक्रिय आहे किंवा अतिसक्रिय आहे हे निश्चित केलं जातं.
थायरॉइड अँटिबॉडीज (Anti-TPO, Anti-Tg): हॅशिमोटोज डिजिजसारख्या ऑटोइम्युन थायरॉइडायटिसना ओळखण्यासाठी उपयुक्त
थायरॉइड अल्ट्रासाऊंड: नॉड्युल्स किंवा गॉयटरसारख्या संरचनात्मक विकृतींची शंका असल्यास ही चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.
पीसीओएसच्या तुलनेत थायरॉइड आजाराचे वेगळेपण म्हणजे तो केवळ प्रजनन स्वास्थ्यापुरता मर्यादित राहत नाही तर शरीराच्या संपूर्ण चयापचय कार्यावर त्याचा परिणाम होतो.
पीसीओएस आणि थायरॉइड या दोन्ही स्थितींमध्ये पुढील लक्षणं दिसू शकतात-
मासिक पाळी अनियमित होणं किंवा पाळी न येणं
केस पातळ होणं किंवा गळणं
कारणाशिवाय वजनात बदल होणं
मन:स्थिती बिघडणं
थकवा
पीसीओएस चाचणी अँड्रोजेनच्या पातळीवर व अंडाशयाच्या कार्यावर लक्ष केंद्रित करते.
थायरॉइड चाचण्या TSH,T3 आणि T4 चयापचय यंत्रणेतील समतोल निश्चित करते.
पीसीओएसमध्ये अंडाशयाची अल्ट्रासाउंड चाचणी केल्यास निदाननिश्चितीस मदत होते. थायरॉइडमध्ये थायरॉइड ग्रंथींची अल्ट्रासाउंड चाचणी केल्याने गाठ किंवा ग्रंथींचा वाढलेला आकार ओळखण्यास मदत करते.
बरेचदा पीसीओएस आणि इन्सुलिन प्रतिरोध या समस्या एकत्र उद्भवतात, तर थायरॉइड आजार हा बरेचदा ऑटोइम्युन अँटिबॉडीजशी संबंधित असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.