Parenting Tips : लहान मुलांना या वाईट सवयींपासून ठेवा दूर; अन्यथा...

Parenting Tips For Children : लहान मुले ही खूप जास्त साधी असतात. ते नेहमीच आजाबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून काही न काही शिकत असतात.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Parenting Tips :

लहान मुले ही खूप जास्त साधी असतात. ते नेहमीच आजाबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून काही न काही शिकत असतात. मोठ्या व्यक्तींच्या सवयी पाहून लहान मुले तसेच वागण्याचा प्रयत्न करतात. टीव्ही , मोबाईलवर दिसणाऱ्या गोष्टी लहान मुले लगेच आत्मसात करतात. परंतु यामुळे त्यांना काही वाईट सवयी लागू शकता. त्यामुळे पालकांनी (Parents) नेहमी सावध राहणे गरजेचे आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहान मुलांना आपण काहीही सांगितले तर ते त्यांना खरे वाटते. त्यामुळे त्यांना नेहमी वाईट सवयी लागण्यापासून दूर ठेवायचे असते. यासाठी त्यांच्या आजूबाजूला नेहमी चांगले वातावरण असायला हवे. त्यामुळे लहान मुलांना (Children) या वाईट लागण्यापासून वेळीच थांबवा.

हट्टीपणा

लहान मुले खूप जास्त हट्टी असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट हवी असते. हीच सवय त्यांना भविष्यात लागू शकते. त्यामुळे पालकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे लहान मुलांना हट्टीपणाची सवय (Habit) असेल तर वेळीच सावध व्हा. त्यांचे प्रत्येक हट्ट पुरवू नका. हट्टीपणा करु नये असे त्यांना सांगा.

Parenting Tips
Chanakya Niti On Parenting : मुलांमध्ये लीडरशीप क्वालिटी विकसित करायची आहे? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

खोटे बोलणे

अनेकदा लहान मुले आजूबाजूला घडत असलेल्या घडामोडी पाहून खूप काही शिकत असतात. त्यामुळे त्यांना कदाचित खोटे बोलण्याची सवय लागू शकते. ही सवय खूप वाईट आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर योग्य ते संस्कार व्हायला आहे. त्यासाठी मुलांना वाईट गोष्टी करण्यापासून वेळीच सावध करा.

चुकीची भाषा वापरणे

अनेकदा मोठ्या माणसांची भाषा ऐकून लहान मुले चुकीची भाषा वापरतात. त्यामुळे त्यांना वाईट सवय लागते. यामुळे मुले इतरांसमोर वाईट भाषा वापरतात. त्यांना वेळीच अडवणे महत्त्वाचे आहे. त्यांना चांगल्या गोष्टी समजावून सांगायला हव्यात.

Parenting Tips
Parenting Tips : मुलं हट्टी झालीत, तुमचं अजिबात ऐकत नाहीत? या टिप्स फॉलो करा, सांभाळणे होईल सोपे

चिडवणे

लहान मुले शाळेत गेल्यावर एकमेकांना चिडवतात. हीच सवय त्यांना भविष्यातही लागते. इतरांना चिडवणे, त्यांच्याबद्दल वाईट बोलणे ही खूप वाईट सवय आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com