Shraddha Thik
मुलांना जन्म देणं सोपं वाटेल परंतू त्यांना वाढवणं आणि त्यांचा सांभाळ करणं हे खूप मोठे आव्हान असते.
मुलांना खायला-प्यायला आणि शिक्षणासाठी चांगल्या शाळेत घालणं म्हणजे त्यांचा सांभाळ करणं नाही.
मुलांना महागडी खेळणी किंवा हव्या असलेल्या वस्तू आणून दिल्या की उत्तम पालक आहे असे अनेक पालकांचा गैरसमज आहे.
मुलांच्या आजुबाजूला सकारात्मक वातावरण असायला हवे.
घरात लागेल, असुरक्षित असेल असे फर्निचर किंवा वस्तू मुले किमान लहान असेपर्यंत अजिबात ठेवू नयेत.
मुलांना घरात बाहेरून आणलेले पदार्थ फारच चमचमीत लागतात आणि ते त्यांचा सारखा हट्ट करतात. हे होण्याधीच तसे पदार्थ घरी आणू नका.
मुलांना घेऊन चित्रपटाला जाणे किंवा बऱ्याचदा मॉल अशा ठिकाणी जाता तेव्हा त्यांच्यामागे ओरडत पळत राहणे अशा गोष्टी आवर्जून टाळा.