Papaya Side Effects : 'या' व्यक्तींनी पपयी खाणे आजच बंद करा; अन्यथा रुग्णालयातील खर्चासाठी तयार राहा

Side Effects Of Papaya: विविध व्याधींनी त्रस्त रुग्णांना देखील पपयी दिली जाते. मात्र पपयी खाणे काही व्यक्तींसाठी घातक आहे हे तुम्हाला माहितीये का? पपयी फार उष्ण असते.
Side Effects Of Papaya
Papaya Side EffectsSaam TV

पपयी हे फळ आजवर तुम्ही अनेकदा खाल्लं असेल. गोड आणि भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्याने अनेकांना याची चवही फार आवडते. पपयी खाल्ल्याने हायड्रेशन, डायबिटीज, ब्लडप्रेशर सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. इतकेच नाही तर आहारात पपयी असल्यास डोळ्यांच्या विविध समस्या देखील कमी होण्यास मदत होते.

Side Effects Of Papaya
Care Fruit Juices : उष्णतेवर मात करण्यासाठी 'या' फळांचा ज्यूस प्या; हायड्रेटेड राहा

पपयी अनेक आजारांवर काम करते. विविध व्याधींनी त्रस्त रुग्णांना देखील पपयी दिली जाते. मात्र पपयी खाणे काही व्यक्तींसाठी घातक आहे हे तुम्हाला माहितीये का? पपयी फार उष्ण असते. त्यामुळे ठरावीक आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

किडनी स्टोन

ज्या व्यक्तींना किडनी स्टोन आहे अशा व्यक्तींनी पपयी खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर देखील देतात. पपयीमध्ये व्हिटॅमीन सी असतं. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी पपयी खाल्ल्याने त्यांचा किडनी स्टोन आणखी वाढण्याची शक्यात असते. यासह पपयीमध्ये कॅल्शियम ऑक्सालेट देखील असते. अशावेळी तुम्हाला किडनी फेल होण्याची समस्या देखील होऊ शकते.

गर्भवती महिला

गर्भवती महिलांसाठी पपयी फार घातक आहे. कदाचीत त्याने बाळाच्या जिवाला देखील धोका होऊ शकतो. पपयी खाल्ल्याने यूटेरस कॉन्ट्रेक्शन सुरु होऊ शकतं. काही प्रकरणात पपयीचे सेवन केल्याने त्या महिलेची प्रसुती वेळेआधीच होण्याची शक्यता असते. असे झाल्यास बाळाची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे बाळासह मातेच्या जीवाला धोका निर्माण होतो.

हृदयविकाराने ग्रस्त व्यक्ती

ज्या नागरिकांना हृदयाशीसंबंधीत आजार आहेत त्यांच्यासाठी देखील पपयी काही प्रमाणात घातक मानली जाते. पपयीत असे काही घटक असतात ज्याने हृदयाचा आजार असल्यास हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी सावधानतेने पपयी खाणे टाळले पाहिजे.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही पपयीच्या सेवनाने होणाऱ्या त्रासाचा दावा करत नाही.

Side Effects Of Papaya
Health Tips Water : तहान नसतानाही पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी घातक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com