Papaya Barfi Recipe : पितृपक्षात प्रसादासाठी बनवा पपयी बर्फी; वाचा ५ मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Papaya Barfi : पितृपक्षामध्ये नैवेद्यात गोड काय बनवावे असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक खास कच्च्या पपयीपासून तयार होणारी रेसिपी आणली आहे.
Papaya Barfi
Papaya Barfi Recipe Saam TV
Published On

सध्या पितृपक्ष सुरू आहे. या काळात प्रत्येकाच्या घरी विविध पदार्थ बनवले जातात. पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून घरी नैवेद्य केला जातो. नैवेद्याच्या थाळीमध्ये एकतरी गोड पदार्थ असला पाहिजे. पदार्थात गोड म्हणून काही घरांमध्ये खिर बनवली जाते. नैवेद्यात हिच खिर दिली जाते. मात्र नेहमी खिर खाऊन अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे खिर ऐवजी काहीतरी टेस्टी आणि नवीन पदार्थ बनवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही कच्च्या पपयी बर्फीची रेसिपी आणली आहे. ही रेसिपी इतकी स्वादिष्ट आहे की घरात प्रत्येक व्यक्तीला आवडेल आणि पितरांसाठी तुम्ही नैवेद्यात सुद्धा ही स्विट म्हणून सुद्धा ठेवू शकाल.

पपयी बर्फी बनवण्यासाठी साहित्य

कच्ची पपयी - १ किलो

दूध पावडर - ५ चमचे

साखर - २ वाटी

शुद्ध तूप - २ मोठे चमचे

ड्रायफ्रूट्स - २ चमचे

फूड कलर - चिमुटभर

Papaya Barfi
Maswadi Recipe : जुन्नर स्टाईल झणझणीत मासवडी घरच्याघरी कशी बनवायची; वाचा रेसिपी

कशी आहे रेसिपी?

कच्च्या पपयीपासून बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी पपयी धुवून घ्या. पपयी धुवून झाल्यावर ती मध्यभागी कापून आधी त्याची साल काढून घ्या. साल काढल्यानंतर पपयी मस्त बारीक किसून घ्या. बारीक किसून घेतल्यावर पपयी एका कढईमध्ये काढून ठेवा.

पुढे ही कढई गॅसवर ठेवा आणि गॅसची फ्लेम लो असूद्या. त्यानंतर पपयी थोडी भाजून घ्या. पपयी थोडी गरम झाली की लगेचच यामध्ये साखर मिक्स करा. साखर मिक्स केल्यावर ती विरघळण्याची वाट पाहा. साखर मस्त विरघळली की पुढे यामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घ्या. मिल्क पावडर मिक्स केल्यावर यावर झाकन ठेवून एक वाफ काढून घ्या.

पुढे यामध्ये थोडं तूप सुद्धा मिक्स करा. तूप सुरुवातीलाच टाकू नका. पपयी थोडी शिजली की तूप मिक्स करा. त्यानंतर ड्रायफ्रूट्स कट करून घ्या. सर्व ड्रायफ्रूट्स तेलात छान तळून घ्या. तेलात तळल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स पपयीमध्ये मिक्स करा. तसेच याला रंग यावा म्हणून चिमुटभर रंग मिक्स करा.

पपयी पूर्ण शिजल्यावर सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. ज्या भांड्यात तुम्ही हे काढणार आहात त्याला आधी तूप लावून घ्या. त्यानंतर यावर पसरवून हे सर्व सेट होण्यासाठी ठेवा. मिश्रण पूर्ण थंड झालं की, त्यावर आणखी थोडे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. त्यानंतर याचे बर्फीच्या आकारात काप करून घ्या.तयार झाली झटपट आणि चविष्ट पपयी बर्फी रेसिपी.

Papaya Barfi
Alu Vadi Recipe: १० मिनिटांत बनवा कुरकुरीत अन् खमंग अळूवडी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com