Palak Recipes: मुलं खात नाहीत पालेभाज्या? आता नो टेंशन; ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी

Palak Recipes For Kids: रोज पालेभाज्या खाणे लहान मुलांसाठी कंटाळवाणे होते. लहान मुलं बाहेरचं खाणं पसंत करतात.
Palak Recipes For Kids
Palak Recipesai
Published On

रोज पालेभाज्या अशाच खाणे लहान मुलांसाठी कंटाळवाणे होते. लहान मुलं बाहेरचं खाणं पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. शिवाय लहान मुलांनी शरीराला पौष्टीक घटक मिळेल असे पदार्थ खाणे महत्वाचे आहे. मग जेव्हा त्यांना आपण पालेभाज्या खाण्यासाठी डब्यात देता तेव्हा मुलं तो संपुर्ण खात नाहीत अशा वेळेस आपण त्यात त्यांच्या आवडीचा पदार्थ मिक्स करून भाजी दिली तर ते टिफीन बॉक्स अगदी स्वच्छ करून आणतात. आज आपण अशीच एक रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी साधीसोपी आणि चविला उत्तम असणार आहे.

भाजी बनवण्याचे साहित्य

1 बचं ताजी पालक

2 बटाटा उकडलेले

4,5 मिरच्या,

9,10 लसूण,

1 टोमॅटो

1 सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल

मोहरी

हिंग

3,4 मिरची (लाल या हिरवी)

1/2 ,1/2 स्पून हळद आणि धणेपूड

मीठ

Palak Recipes For Kids
One Pot Meal: टिफीनसाठी ट्राय करा 'ही' चमचमीत चविष्ट रेसिपी; झटपट होईल तयार

भाजी बनवण्याची कृती

प्रथम ताजी पालक दोन तीन वेळा स्वच्छ धुवा नंतर छान चिरून घ्या. मग 2 बटाटा, 4,5 मिरच्या, लसूण,1 टोमॅटो हे साहित्य चिरून घ्या. आता कढई गरम करून एक सर्व्हिंग स्पूनने मोहरीचे तेल ओता मग एक मिनिटानंतर मोहरी ,हिंगाची फोडणी द्या. पुढे त्यात चिरलेली मिरची आणि लसूण एकत्र करून पुन्हा परता.

अर्ध्या मिनिटांनंतर हळद आणि धणेपूड अ‍ॅड करून पुन्हा फोडणी मिक्स करा. आता एक चिरलेला टोमॅटो अ‍ॅड करा. त्याला एक मिनिटानंतर त्यात चिरलेली पालक आणि बटाटे अ‍ॅड करून नीट मिक्स करा मग मीठ अ‍ॅड करा. आता हे सगळं पुन्हा मिसळा आणि कढईचे झाकण झाकून ठेवा. चार मिनिटे शिजवा नंतर उघडा आणि पुन्हा मिसळा आणि पुन्हा चार पाच मिनिटे स्लो फ्लेमवर शिजवा आणि गॅस बंद करा.

Written By: Sakshi Jadhav

Palak Recipes For Kids
Christmas Gifts: ख्रिसमसनिमित्त द्या 'या' खास भेटवस्तू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे होतील खूश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com