Use of old mobile : जुना मोबाईल फेकू नका; असा करा स्मार्ट वापर, घरचेही होतील खूश

Use of old mobile in Marathi : नवीन फोन खरेदी केल्यानंतर ते त्यांचे जुने मोबाईल घराच्या एका कोपऱ्यात ठेवून देतात. घराच्या कोपऱ्यात धुळखात पडलेल्या जुन्या स्मार्टफोनचा चांगला फायदा होऊ शकतो.
Mobile Virus
Mobile VirusSaam Tv
Published On

Old mobile use:

बाजारात नवनवीन मोबाईल येत आहेत. नवीन मोबाईल बाजारात आल्यानंतर अनेक जण त्याकडे आकर्षित होतात. तर काही जण वर्षोनुवर्षे जुनाच मोबाईल वापरतात. काही जणांनी नवीन फोन खरेदी केल्यानंतर ते त्यांचे जुने मोबाईल घराच्या एका कोपऱ्यात ठेवून देतात. घराच्या कोपऱ्यात धुळखात पडलेल्या जुन्या स्मार्टफोनचा चांगला फायदा होऊ शकतो. यामुळे तुमचे हजारो रुपयांची बचत होऊ शकते. (Latest Marathi News)

तुम्ही जुन्या मोबाईलचा सीसीटीव्ही म्हणून वापर करू शकता. यामुळे तुमचे हजारो रुपयांची बचत होऊ शकते. तुमच्या जुन्या मोबाईलच्या कॅमेराचे सर्विलेंस कॅमेरात रुपांतर करता येऊ शकते. यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये Alfred Home Security Camera, Wyze किंवा Athome Camera डाऊनलोड करू शकता.

Mobile Virus
Business Idea In Marathi: अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात सुरु करा व्यवसाय; होईल तगडी कमाई, जाणून घ्या

सीसीटीव्ही कसा तयार कराल?

CCTV : तुम्ही सर्वात आधी जुन्या आणि नव्या मोबाईलमध्ये अल्फ्रेड अॅप डाऊनलोड करावा. जुन्या गुगल अकाऊंटवरून साइन इन करावं. जुन्या स्मार्टफोन कॅमेरावर कॅमेरा मोड निवडावा. तर दुसऱ्या स्मार्टफोनवर व्हीव मोड निवडावा. जुना मोबाईल घरात उंचीवर ठेवावा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Remote : तुम्ही जुन्या मोबाईलचा रिमोट कंट्रोल म्हणूनही उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला Unified रिमोट, यूनीवर्सल टीव्ही रिमोट किंवा गॅलेक्सी यूनिवर्सल रिमोट सारखे अॅप डाऊनलोड करू शकता. त्यानंतर या फोनचा रिमोट कंट्रोल सारखा वापर करू शकता.

GPS Tracker : तुम्ही जुन्या स्मार्टफोनचा कारमध्ये नेव्हिगेटरच्या रुपात वापर करू शकता. तसेच जुन्या स्मार्टफोनमध्ये यासारखे अनेक अॅप्स डाऊनलोड करू शकता.

Mobile Virus
Rural Business Idea In Marathi: गावात सुरु करा हटके व्यवसाय; दिवसाला कराल हजारो रुपयांची कमाई, जाणून घ्या भन्नाट आयडिया

Gaming : फोनवर गेम खेळल्यामुळे फोनची बॅटरी खर्च होते. मोबाईलची बॅटरी संपल्याने मोबाईल स्विचऑफ होतो. तुम्हाला गेम खेळण्याची आवड असेल तर तुम्ही गेम खेळण्यासाठी जुन्या मोबाईला वापर करू शकता.

Reader : तुम्हाला वाचणाची आवड असेल तर तुम्ही जुन्या मोबाईलवर किंडल किंवा ई-बूक पुस्तक वाचू शकता. ई-बूक वाचण्यासाठी तुम्ही प्रवासातही जुना मोबाईल घेऊन फिरू शकता.

Alarm Clock : तुम्ही जुन्या स्मार्टफोनचा अलार्म क्लॉक सारखा वापर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com