Ola Cheapest Rate
Ola Cheapest Rate Saam Tv

OLA Cheapest Rate : 15 ऑगस्टपर्यंत OLAची ऑफर, एका चार्जमध्ये 125KM रेंज; S1 Air 10000 ने कमी किमतीत उपलब्ध

OLA Offer On Electric Scooter Till 15th August : OLA ने नुकतेच देशांतर्गत बाजारात नवीन अवतारात आपले सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल OLA S1 Air सादर केले आहे.

OLA Offer On S1 Air : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी OLA ने नुकतेच देशांतर्गत बाजारात नवीन अवतारात आपले सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल OLA S1 Air सादर केले आहे. ही स्कूटर कंपनीने प्रास्ताविक किंमत म्हणून 1,09,999 (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली होती, जी केवळ 31 जुलैपर्यंत वैध होती.

पण आता ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ही किंमत 15 ऑगस्टपर्यंत वैध असल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच कमी किमतीत ही स्कूटर खरेदी करण्याची संधी ग्राहकांना वाढली आहे.

OLA चे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, "S1 Air ची मागणी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे, बरेच लोक आम्हाला 1|1 लाख रुपयांची ऑफर (Offer) उघडण्यास सांगत आहेत. आम्ही ही ऑफर सर्वांसाठी आज रात्री 8 पासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 पर्यंत वाढवत आहोत. आमची सर्व दुकाने आज मध्यरात्रीपर्यंत Open असतील, जलद वितरणासाठी लवकर खरेदी करा!”

OLA S1 Air ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आहे. सध्या, ते फक्त रु. 1.10 लाखांच्या प्रास्ताविक किंमतीसह उपलब्ध आहे. नंतर त्याची किंमत 10,000 रुपयांनी वाढवली जाईल, त्यानंतर त्याची किंमत 1.19 लाख रुपयांपासून सुरू होईल. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर नवीन निऑन ग्रीन कलरमध्ये सादर केली आहे ज्यामुळे ती आणखी आकर्षक झाली आहे.

Ola Cheapest Rate
Electric Scooter : अनेक इलेक्ट्रिक दुचाकींना टक्कर देणार Ola S1 Air! दमदार रेंजसह मिळतेय स्मार्टफोन कनेक्टिविटी, लवकरच सुरु होणार बुकिंग

नवीन OLA S1 Air कशी आहे -

कंपनीचा दावा आहे की या स्कूटरची चाचणी 5 लाख किलोमीटरपर्यंत झाली आहे. हे सुरुवातीला 2.7kW मोटरसह ऑफर केले गेले होते, परंतु आता 4.5kW युनिटसह अपग्रेड केले गेले आहे. हे बेल्ट-ड्राइव्हऐवजी हब मोटर वापरते, जसे तुम्ही S1 आणि S1 Pro मध्ये पाहता. याशिवाय कंपनीने या स्कूटरमध्ये आणखी काही बदल केले आहेत ज्यामुळे त्याची किंमत कमी करता येईल.

बॅटरी पॅक आणि ड्रायव्हिंग रेंज -

Ola S1 Air मध्ये कंपनी 3kW क्षमतेचा बॅटरी पॅक देत आहे. ओला इलेक्ट्रिकचा दावा आहे की ही बॅटरी एका चार्जमध्ये 125 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तथापि, त्याच्या चार्जिंग वेळेबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही. याचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे आणि तीन ड्रायव्हिंग मोडसह येतो, ज्यामध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोड समाविष्ट आहेत. ही स्कूटर केवळ 3.3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com