सावधान! स्थूल आणि लठ्ठ असलेल्यांना कँसरचा धोका? स्थूल लोकांना होऊ शकतो 'या' प्रकरचा कँसर

Cancer Awarness: आजकल बदललेल्या जीवनशैलामुळे तुमच्या आहाराकडे आणि स्वत:कडे दुर्लक्ष केलं जातं . त्यामुळे कँसर सारख्या समस्या दैनंदिन वाढतांना दिसत आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यामध्ये देखील कँसरचे रुग्ण आढळून येतात.
स्थूल
CancerCanva
Published On

कँसर म्हटलं की, हल्ली भीती ही संकल्पना आपल्या मनात बसली आहे. पण साधारणतः सेलिब्रीटीजलाच कँसर जास्त होतो. याशिवाय सर्वसामान्यांनाही कँसरचा धोका नाकारता येत नाही. आतापर्यंत तुमच्याच आजुबाजुच्या लोकांना कँसर झाल्याचं तुम्ही पाहिलं असेलही. आधीच्या काळात यावर फार उपाय नव्हते. पण आता परिस्थिती वेगळी आहे. यावर आता उपचार उपलब्ध आहे. पण तेही जर वेळीच निदान झालं तरंच. कँसर जर तिसऱ्या स्टेपचा असेल तर आणखीनच कठीण. पण आता यात एक धक्कादायक अशी माहिती समोर येते आहे. ती म्हणजे स्थूलतेमुळे कँसरचा धोका अधिक बळावतो. आता स्थूल आणि जाड लोकांमध्ये कँसरचा धोका कसा वाढतो याची कारणं जाणून घेऊया.

लठ्ठ असलेल्या लोकांमध्ये पचनासंबंधी समस्या असतात. त्यामुळे त्यांना पचनक्रियेबाबत अडचणी येतात. एकाच जागी बसून राहणं, किंवा व्यायाम न करणं या कारणांमुळे पचनक्रिया मंदावते. आणि मग कँसरच्या पेशींची शरिरात निर्मीती होते. त्यामुळे स्थूल असलेल्या लोकांनी जेवण झाल्याबरोबर लगेच झोपू नये थोडं चालावं. किंवा नियमीत व्यायाम करावा. यामुळे तुमचं शरिर मोकळं राहील आणि स्थूलता कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होई, आणि मग कँसरच्या पेशींची निर्मीती होणार नाही.

तुम्ही खात असणाऱ्या अति तेलकट किंवा फास्टमुळेही वजन वाढतं. आणि खाण्याच्या पदार्थांमुळेही कँसरच्या पेशी निर्माण होऊ शकतात. स्थूल व्यक्ती जर फास्ट फूड खात असतील तर त्यांच्यात सर्वात जास्त कँसरच्या ग्रंथी बनू शकतात, असं एका अहवालात सांगितलं आहे. त्यामुळे खाताना योग्य आहार असेल याची काळजी घ्या. फार तेलकट पदार्थ खाऊ नये. जो पदार्थ पचायला हलके असतील असेच पदार्थ खावेत.

स्थूल व्यक्तींमध्ये साधाराणतः खालीलप्रमाणे या प्रकारच्या कँसरचा समावेश आहे. त्यात,

स्तनांचा कँसर

गर्भाशय कँसर

तोंडाचा कँसर

फुफ्फुसाचा कँसर

ब्लड कँसर

आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार भारतात सध्या ब्रेस्ट कँसरचं प्रमाणा प्रचंड वाढलं आहे. भारतात 10 पैकी एका भारतीयाला कँसर होत असल्याचं धक्कादायक वास्तवही समोर आलं आहे. आधी फुफ्फुसाचा कँसर व्हायचा पण आता ब्रेस्ट कँसरच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्थूलतेचं प्रमाणंही स्त्रियांमध्येच जास्त आहे. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे वेळीच सावध राहणं गरजेचं आहे. काळजी घ्या, व्यायाम करा, खूश राहा, आणि आरोग्य सांभाळा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com