आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

नॅशनल अॅक्रिडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलिजल सोसायटीज ऑफ इंडियाच्या मान्यता माता आरोग्य दर्जा मानकांचा समावेश एनएबीएचच्या सर्व प्रमाणन कार्यक्रमांमध्ये केलाय.
NABH
NABHsaam tv
Published On

नॅशनल अॅक्रिडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलिजल सोसायटीज ऑफ इंडियाच्या मान्यता माता आरोग्य दर्जा मानकांचा समावेश एनएबीएचच्या सर्व प्रमाणन कार्यक्रमांमध्ये केलाय. मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या तसेच भारत सरकारच्या ‘वन नेशन, वन स्टॅण्डर्ड’ या उद्दिष्टाच्या दिशेने पुढील पाऊल टाकण्याच्या उद्देशाने, एनएबीएच व एफओजीएसआय यांच्यात २०२२ मध्ये झालेल्या धोरणात्मक कराराचाच हा भाग आहे.

देशात असलेल्या मानकांच्या माध्यमातून मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित मापदंड प्रस्थापित करून, हा करार व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास चालना देणार आहे. याचसोबत वैश्विक आरोग्य संरक्षण साध्य करण्याच्या दृष्टीने चाललेल्या प्रयत्नांमध्ये योगदानही देणार असल्याची माहिती आहे.

मान्यता हा एफओजीएसआयचा फ्लॅगशिप (प्रमुख) दर्जा सुधारणा व प्रमाणन उपक्रम आहे. बाळंतपणादरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतर आईची सातत्यपूर्ण, सुरक्षित आणि आदरपूर्वक काळजी घेण्याच्या प्रक्रियेत विशिष्ट दर्जा राखला जाईल याची पुष्टी हा उपक्रम करतो. बाळाच्या जन्मपूर्वी, बाळंतपणादरम्यान आणि बाळंतपणानंतर (पोस्टपार्टम) अशा टप्प्यांमध्ये मातेच्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओच्या मानकांच्या आधारे पुराव्यावर आधारित क्लिनिकल नियमांचा अवलंब करण्यास हा उपक्रम उत्तेजन देतो.

दोन संस्थांमधील या करारापूर्वी एक कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला. यामध्ये मान्यता मानकांनुसार प्रशिक्षण घेतलेल्या २०० खासगी प्रसुतीगृहांचं एनएबीएचच्या मूल्यांकनकर्त्यांद्वारे करण्यात आलं. एफओजीएसआयने या कामासाठीच मूल्यांकन करणाऱ्यांची नियुक्ती केली होती व त्यांना प्रशिक्षणही दिले होते. मूल्यमापन एफओजीएसआय किंवा एनएबीएच यापैकी कोणाच्याही मूल्यांकनकर्त्यांनी केले तरीही प्रमाणन सातत्याने यशस्वी ठरत गेल्याचे प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणात आढळले.

NABH
Bypass surgery: हार्ट बायपास सर्जरी झालीये? दिवसागणिक काय आणि कशी काळजी घ्याल हे समजून घ्या तज्ज्ञांकडून...

एनएबीएचचा प्रवेश-स्तरावरील प्रमाणन कार्यक्रम करत असलेल्या आस्थापनांना यापुढे एनएबीएच आणि मान्यता यांची दुहेरी प्रमाणपत्रे प्राप्त होऊ शकतील. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्यसेवा मानक व विशेषीकृत माता सेवा नियम या दोन्हींची पूर्तता करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब होईल, एनएबीएच होप पोर्टल त्यांना अर्ज प्रक्रिया व मूल्यमापनासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म पुरवेल. याशिवाय संस्थेच्या नेटवर्कचा लाभ घेत एफओजीएसआय मूल्यांकनकर्त्यांचा शोध घेईल.

एनएबीएचचे अध्यक्ष श्री. रिझवान कोइता याबाबत म्हणाले, “प्रत्येक मातेला तिच्या प्रसूतीच्या ठिकाणानुसार योग्य ती काळजी मिळावी यासाठी एकसमान मानकं अत्यावश्यक आहेत. नॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स (NABH) च्या प्रमाणपत्र कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करून, आपण केवळ आमच्या मान्यतेच्या चौकटीस मजबूत करत नाही आहोत, तर मातृ आरोग्यासाठी एक नवीन मापदंडही निश्चित करत आहोत. या प्रमाणकीकरणामुळे संपूर्ण भारतात मातृ काळजी बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाणार आहे.

“आमच्या अधिमान्यता प्रक्रियेमध्ये मान्यता मानकांचे एकात्मीकरण होणे हे मातांचे आरोग्य सुधारण्याच्या दिशेने टाकलेले कायापालट घडवून आणणारे पाऊल आहे," असे एनएबीएचचे सीईओ डॉ. अतुल मोहन कोचर म्हणाले. "या सहयोगामुळे आमच्या प्रयत्नांना एफओजीएसआयच्या कौशल्यांची जोड मिळेल, अधिमान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये सर्वसमावेशक माता आरोग्य नियमांची पूर्तता होत असल्याची निश्चिती यामुळे होईल. दर्जा अधिमान्यतेसाठी शाश्वत प्रारूप तयार करून देशभरातील माता व नवजात अर्भकांना त्याचा लाभ देणे हे आमच्यापुढील लक्ष्य आहे," असेही ते म्हणाले.

NABH
डाळ शिजवताना त्यावर येणारा फेस आरोग्यासाठी धोकादायक? पाहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर

एफओजीएसआयच्या महासचिव डॉ. माधुरी पटेल म्हणाल्या, “"गेल्या दोन दशकांत सुमारे 13 लाख भारतीय महिलांनी मातृत्वाशी संबंधित कारणांमुळे आपला जीव गमावला असून, एकूण मातृ मृत्यू दरात 70% घट होऊनही, प्रगती अधिक वेगवान करण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांचे 2030 चे शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि सर्वसामान्य आरोग्य सेवा प्राप्त करण्यासाठी, आपल्याला आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी आपला निर्धार वाढवावा लागेल. सहयोगाच्या सामर्थ्याचा वापर करून आपण काळजी मानके स्थिर करू शकतो, सेवा वितरण सुधारू शकतो आणि मातृ आरोग्यसेवा सुलभता वाढवणारे शाश्वत उपाय तयार करू शकतो."

एफआयजीओ आशिया ओशिनियाचे विश्वस्त, एफओजीएसआयचे यापूर्वीचे अध्यक्ष आणि एफओजीएसआय-मान्यता उपक्रमाचे प्रमुख प्रशासक डॉ. हृषिकेश डी. पै म्हणाले, “एफओजीएसआय आणि एनएबीएच यांच्यातील सहयोग हा उत्कृष्टता, जबाबदारी व खासगी क्षेत्रात रुग्णकेंद्री सेवाभाव यांची जोपासना करणाऱ्या संस्कृतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या यशाच्या पायावर उभारणी करण्यासाठी तसेच या उपक्रमाचे यश अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. यामुळे सर्वोत्तम पद्धतींच्या व्यापक स्तरावरील अंगिकाराला प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय, प्रत्येक बाळंतपण हा एक सुरक्षित, साधार व प्रतिष्ठेचा अनुभव ठरेल अशा भविष्यकाळाच्या दिशेने जाणारा मार्ग यातून तयार होऊ शकेल.”

NABH
Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

एफओजीएसआय-मान्यता उपक्रमाच्या राष्ट्रीय निमंत्रक डॉ. हेमा दिवाकर म्हणाल्या, “प्रत्येक मातेला, मग ती कोणत्याही परिस्थितीतील असो, अनुकंपायुक्त व उत्कृष्ट काळजी घेतली जाण्याचा हक्क मिळवून देण्याची एफओजीएसआय व एनएबीएचची सामाईक दृष्टी या घोषणेतून स्पष्ट होते. एफओजीएसआय व एनएबीएच या दोन्ही सदस्यांच्या संयुक्त तांत्रिक कार्यकारी समूहाच्या माध्यमातून आम्ही दर्जा मानकांमध्ये शिस्तबद्धता आणण्यावर काम करत आहोत. या मानकांमध्ये पायाभूत सुविधा तसेच प्रसुतीकक्षासारख्या सुविधांचा मेळ उत्तम साधला जाईल आणि माता व नवजातांची काळजी उत्तमरित्या घेतली जाईल यासाठी आम्ही काम करत आहोत. या धोरणात्मक करारामुळे रुग्णांची सुरक्षितता व क्लिनिकल उत्कृष्टता यांच्याप्रती आमची बांधिलकी तर अधिक दृढ झालीच आहे, शिवाय, उच्च दर्जाची, मानकीकृत सेवा देण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यातील लाभही अधोरेखित होत आहेत.”

एफओजीआयएसच्या माजी अध्यक्ष व आयएफएफएसच्या खजिनदार डॉ. रिष्मा पै म्हणाल्या, “एनएबीएचच्या प्रमाणन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मान्यताच्या सर्वसमावेशक नियमांचा समावेश करून, मातांना सर्वत्र दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांचा दर्जा उंचावणारी ठोस, एकात्मिक प्रणाली विकसित करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. दर्जेदार आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवणे व दिल्या जाणाऱ्या सेवांचे मानकीकरण करणे एवढ्यापुरते आमचे उद्दिष्ट मर्यादित नाही, तर ही एक नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे या आस्थापनांमध्ये येणाऱ्या प्रत्येक मातेची व बाळाची सुरक्षितता निश्चित केली जाणार आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com