Presvu Eye Drops: चष्मा घालवण्यासाठी ऑपरेशनची गरज नाही, आय ड्रॉपने नजर होईल चांगली

Presvu Eye Drops : आपल्यातील बहुतेकांना कमी दिसण्याची समस्या उद्भवत असते. प्रत्येकांना डॉक्टर चष्मा लावणयास सांगतात. ज्या लोकांना कमी दिसण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Presvu Eye Drops: चष्मा घालवण्यासाठी ऑपरेशनची गरज नाही, आय ड्रॉपने नजर होईल चांगली
one india
Published On

नजर कमी झालेल्यांसाठी ऑपरेशन करण्याची आता गरज नाही.फक्त औषधाचा एक थेंब तुमचा दृष्टी दोष दूर करेल. एवढंच नव्हे तर तुम्हाला चष्मा लावण्याचीही गरज उरणार नाही. त्यामुळे हा ड्रॉप कमी दिसणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कोणता आहे हा ड्रॉप? कुठे आणि किती रुपयांना मिळतो? पाहुयात यावरचा सविस्तर रिपोर्ट.

ना शस्त्रक्रिया. ना कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याची गरज. एक ड्रॉप फक्त एक ड्रॉप नजर आणेल. असा कोणता हा ड्रॉप आहे याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल. मात्र, काळजी करू नका.या ड्रॉपची सगळी माहिती आम्ही सांगणार आहोत. या आयड्रॉपचं नाव आहे प्रेस्वू आय ड्रॉप्स. मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने पायलोकार्पिन वापरून बनवलेले “प्रेस्वू” आय ड्रॉप्स लाँच केलंय.हा ड्रॉप नजर कमी असलेल्यांसाठी संजीवनीच असणार आहे.कसा आहे हा ड्रॉप? कुठे मिळणार? सगळ्यांसाठीच हा उपयुक्त आहे का? यावर एक नजर टाकूयात.

Presvu Eye Drops: चष्मा घालवण्यासाठी ऑपरेशनची गरज नाही, आय ड्रॉपने नजर होईल चांगली
India Diabetes capital of the world: भारतात डायबेटीजचा 'टाईमबॉम्ब; रुग्णांचा आकडा पाहून सुटणार घाम, VIDEO

चष्मा घालवणारा आय ड्रॉप

या आय ड्रॉपमुळे कॉन्टॅक्ट लेन्स आणि शस्त्रक्रियेची गरज नाही

हा आय ड्रॉप डोळ्यात टाकल्यास चष्म्यापासून सुटका

ड्रॉप डोळ्यात टाकल्यास बाहुलीचा आकार कमी करून अडथळा दूर होणार

एक थेंब डोळ्यात टाकल्यास 15 मिनिटांत निकट दृष्टीदोष दूर होणार

ड्रॉप डोळ्यात टाकल्यानंतर त्याचा 6 तास प्रभाव राहणार

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून 350 रूपयांना हा ड्रॉप उपलब्ध

त्यामुळे तुम्ही हा ड्रॉप वापरणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि हा ड्रॉप वापरा...फक्त 350 रुपयांमध्ये हा ड्रॉप उपलब्ध होत असल्यामुळे सामान्यांनाही याचा फाय़दा होणार आहे. त्यामुळे जवळची नजर कमी असणाऱ्यांसाठी हा ड्रॉप वरदान ठरणाराय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com