New Year Kashmir Destinations 2025: नववर्षाची सुरुवात करा आणखी खास, काश्मीरमधील 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट

New Year 2025 Jammu And Kashmir Travel 2025: हिवाळ्यात थंड वातावरण आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी लोक हिमाचल किंवा जम्मू-काश्मीरला जाण्याचा विचार करतात. त्यापैकी सोनमर्ग हे लोकप्रिय ठिकाण आहे.
Jammu & Kashmir
Jammu & Kashmiryandex
Published On

२०२४चे वर्ष संपून २०२५च्या वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांनाच खास पद्धतीने करायची असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक जण आपले कुटुंब, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात. हिवाळ्यात अनेकांना हिमाचल, उत्तराखंड किंवा जम्मू-काश्मीरला भेट द्यायला आवडतं. येथील सुंदर दृश्ये मनाला भुरळ घालतात. येथे स्कीइंग, स्नोबोर्डिंग अशा अनेक प्रकारची ॲक्टिव्हिटी करण्याची संधी तुम्हाला मिळेल. अनेक लोक स्नोफॅाल पाहण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गला जाण्याचा विचार करतात. सोनमर्गमध्ये हिवाळ्यात बर्फवृष्टी पाहायला मिळते. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य आणखी वाढते. सोनमर्ग येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जेथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नवीन वर्षाची सुरुवात खास करण्यासाठी सहलीची योजना आखू शकता.

सतसर सरोवर

तुम्हाला काश्मीरमध्ये अनेक सरोवर दिसतील. सोनमर्गमध्येही अनेक सरोवर आहेत. त्यातील एक म्हणजे सतसर तलाव. हे सरोवर समुद्रसपाटीपासून सुमारे 3,610 मीटर उंचीवर आहे. हा सात अल्पाइन सरोवरांचा संगम आहे जो एकमेकांना जोडलेला आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि नयनरम्य दृश्ये तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात अविस्मरणीय करतील.

बालटाल व्हॅली

बालटाल व्हॅली सोनमर्गपासून १५ किलोमीटर अंतरावर असून हे सिंधी नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे धबधबे, बर्फाच्छादित पर्वत आणि नद्यांचे सुंदर दृश्य पाहण्यासारखी आहे. हिवाळ्यात येथील दृश्य अतिशय आकर्षक असते. बालटाल व्हॅलीला अमरनाथ यात्रेचे प्रारंभिक ठिकाण देखील मानले जाते. अमरनाथ गुहा बालटाल व्हॅलीपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे.

Jammu & Kashmir
New Year Travel 2025: नवं वर्ष करा स्पेशल! पहिल्याच वीकेंडला द्या 'या' अप्रतिम ठिकाणांना भेट

कृष्णासर सरोवर

कृष्णासर तलाव सोनमर्ग जवळ असून आणि हे ठिकाण सुमारे 3,710 मीटर उंचीवर आहे. विशंसार तलावापासून एक किलोमीटर अंतरावर हे सुंदर ठिकाण आहे. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्ही जर सोनमर्गसा जाण्याचा प्लान करत असाल तर या ठिकाणी भेट द्यायला विसरु नका.

थाजीवास ग्लेशियर

डोंगराळ प्रदेशात असलेला हा सरोवर नद्या आणि पर्वतांनी भरलेला आहे. थाजीवास ग्लेशियर हे सोनमर्गमधील खूप सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्हाला ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि हायकिंगसारख्या साहसी अॅक्टीव्हिटी करण्याची संधी मिळेल. हे सुंदर आणि मनमोहक ठिकाण तुमच्या नवीन वर्षाच्या आठवणी खास करतील. तुमच्या कुटंबासह या ठिकाणी नक्की जा.

गडसर सरोवर

गडसर सरोवर हे सोनमर्गमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. नवीन वर्षात भेट देण्यासाठी हे ठिकाम उत्तम ठरेल. हे सरोवर यमसर सरोवर या नावानेही प्रसिद्ध आहे. हे काश्मीरमधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय सरोवरांपैकी एक आहे तसेच हे सर्वात उंचावर वसलेले सरोवर आहे. गडसर सरोवर हा ग्रेट लेक्स ट्रॅकचा एक भाग आहे. येथे जाण्यासाठी गडसर व्हॅलीतून जावे लागते.

Jammu & Kashmir
Pre Diabetes : प्री डायबिटीज स्टेज म्हणजे काय? मधुमेह टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com