New Year Travel 2025: नवं वर्ष करा स्पेशल! पहिल्याच वीकेंडला द्या 'या' अप्रतिम ठिकाणांना भेट

New Year 2025 Travel Destinations: जर तुम्ही 2025 च्या पहिल्याच महिन्यात कुठेतरी भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही ठिकाणांबद्द्ल सांगणार आहोत. जेथे तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
New Year
New Yearyandex
Published On

नवीन वर्षात अनेक नवीन गोष्टींची सुरुवात होते. सर्वजण नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात. यासाठी, लोक त्यांचे कुटुंब, मित्र, आणि जवळच्या व्यक्तींसह सहलीला जातात. त्यामुळे नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वत्र गर्दी असते. अशा परिस्थितीत गर्दीमुळे तुम्हाला कुठे जाण्याचा प्लॅन करता येत नसेल, तर आम्ही तुम्हाला भारतातील काही अशा सुंदर आणि शांत ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जेथे तम्ही तुमच्या व्यक्तींसोबत भेट देऊ शकता. आणि चांगला वेळ घालवू शकता.

काश्मीर

काश्मीरला जाण्यासाठी जवळपास सर्वाच राज्यातून उड्डाणे उपलब्ध आहेत. काश्मीरचे सौंदर्य आणि परंपरा पर्यटकांना आकर्षित करतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासह दल सरोवरात शिकारीला जाऊ शकता. तसेच गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता. येथील शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्ये तुमच्या नवीन वर्षाची पहिली सहल अविस्मरणीय करतील.

गोवा

जर तुम्हाला हिवाळा आवडत नसेल आणि त्यापासून दूर कुठेतरी जायचे असेल तर गोवा हा एक उत्तम पर्याय आहे. वर्षाच्या पहिल्या वीकेंडला गोव्याला जाऊ शकता. तुम्ही तेथील समुद्रकिनारे, कॅफे आणि नाइटलाइफचा अनुभव घेऊ शकता. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येथे बरेच पर्यटक येतात, परंतु काही दिवसांनी लोकांची संख्या कमी होते. यामुळे वर्षाच्या पहिल्या वीकेंडला तुम्ही गोव्याला जाऊ शकता.

जयपूर

जयपूरमध्ये थंडीच्या वातावरणात तुम्ही जयपूरचा किल्ला आणि राजवाडे पाहायला जाऊ शकता. राजस्थानी संस्कृती, शाही राजवाडे, किल्ले आणि हवेल्या एक्सप्लोर करु शकता. जयपूरमध्ये आमेर किल्ला, हवा महल, सिटी पॅलेस सारखी सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

New Year
New Year Childrens Resolution 2025: नव्या वर्षात तुमच्या मुलांसाठी करा 'हे' संकल्प; आयुष्याला कलाटणी मिळणार

नैनिताल

नैनिताल हे उत्तराखंडमधील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता. आजकाल नैनितालपासून फार दूर नसलेल्या कैंची धामलाही पर्यटक जातात. वर्षाच्या पहिल्या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासह येथे सहलीसाठी जाऊ शकता. येथे तुम्ही जोडीदारासह नैनिताल तलावात बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. आणि नैना देवीच्या मंदिरात दर्शन घेऊ शकता.

औली

औली हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात स्थित आहे आणि भारतातील एक प्रमुख स्कीइंग ठिकाण आहे. हिवाळ्यात हे ठिकाण बर्फाने झाकलेले असते आणि येथील सुंदर दृश्यांना पाहण्यासाठी आणि येथील शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी तुम्ही येथे नक्की भेट दिली पाहिजे. तुम्ही येथे हिमालयातील नंदा देवी आणि त्रिशूल शिखरांचे दृश्ये पाहू शकता. यासोबत गरमागरम चहा आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता.

New Year
Pre Diabetes : प्री डायबिटीज स्टेज म्हणजे काय? मधुमेह टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com