Consume These Foods With Tea : चहासोबत या पदार्थांचे सेवन करू नका, होऊ शकतात गंभीर आजार

Health Tips : देशातील बऱ्याच लोकांना चहाचे वेड आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
Consume These Foods With Tea
Consume These Foods With TeaSaam Tv
Published On: 

Consume These Foods With Tea : देशातील बऱ्याच लोकांना चहाचे वेड आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. काही लोकांची दिवसाची सुरवात चहाच्या कपाने सुरुवात करतात. काही लोक असंही म्हणतात की त्यांनी चहा प्यायला नाही तर त्यांचा दिवस अजिबात सुरू होत नाही.

आपण सर्वजण चहासोबत काहीतरी खातो, मग ते बिस्किट असो किंवा मिश्रण. अनेक वेळा चहासोबत आपण अशा काही पदार्थांचे (Food) सेवन करतो, जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. चला तर मग जाणून घेऊयात, चहासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये.

Consume These Foods With Tea
Green Tea On empty Stomach: सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

पालक पकोडे

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चहासोबत पालक पकोडे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. वास्तविक पालकामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट संयुगे असतात, जे शरीरात लोह शोषण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे चहासोबत लोहयुक्त पदार्थ खाऊ नका.

बिस्किटे

बर्‍याच लोकांना चहासोबत बिस्किटे खायला आवडतात, परंतु हे अन्न संयोजन तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी (Health) हानिकारक असू शकते. खरे तर मैदा आणि साखर मिसळून बिस्किटे बनवली जातात, त्यामुळे चहासोबत अतिरिक्त साखर आणि मैदा खाणे पोटासाठी चांगले नाही. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता, आम्लपित्तासारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात.

Consume These Foods With Tea
Is Tea Good For Children: काय सांगता! चहा प्यायल्याने मुलांच्या उंचीवर होतोय परिणाम?

लिंबू सेवन टाळा

चहा पिल्यानंतर किंवा त्यासोबत लिंबू सेवन करणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. खरंतर चहासोबत लिंबू सेवन केल्याने चहा अधिक आम्लयुक्त बनतो, ज्यामुळे आम्लपित्त आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.

चहा नंतर पाणी पिऊ नका

चहानंतर लगेच पाणी (Water) कधीच पिऊ नये किंवा आईस्क्रीम सारख्या थंड पदार्थाचे सेवन अजिबात करू नये, त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटाच्या समस्या सुरू होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.