Upvasachi Khichdi: नवरात्री स्पेशल! नऊ दिवसात उपवासाला एकदा तरी बनवा उपवासाची खिचडी, सोपी आहे रेसिपी

Sabudana Upvas Khichdi: नवरात्रीच्या उपवासाला खास साबुदाणा खिचडी बनवा. सोपी व चविष्ट रेसिपी जाणून घ्या. उपवासात खाण्यासाठी ही डिश उत्तम आणि पौष्टिक आहे.
Upvasachi Khichdi
Upvasachi KhichdiSaam Tv
Published On

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. नऊ दिवस माता दुर्गेची मनोभावे पूजा केली जाते. नऊ दिवस उपवासाचे व्रत करतात. नवरात्रीच्या उपवासाला विविध पदार्थ नऊ दिवस खाल्ले जातात. नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही साबुदाणा खिचडी खास बनवू शकता. साबुदाणा खिचडी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Upvasachi Khichdi
Shardiya Navratri 2025: नवरात्रीची दुसरी माळ, माता ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या

साहित्य

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, कढीपत्ता, तूप, सैंधव मीठ हे साहित्य घ्या

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या २ ते ३ तास पाण्यात भिजवून घ्या असे केल्याने साबुदाणा मऊ होऊन चांगले फुगतात.

गॅसवर एका कढईत शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे साल काढून मिक्सरमध्ये बारीक करा.

यानंतर बटाटे हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

Upvasachi Khichdi
Navratri 2025: नवरात्रीत महिलांच्या सोळा श्रृंगाराचे महत्व काय?

कढईत गरम तेलामध्ये कढीपत्ता, हिरव्या मिरच्या भाजून घ्या यानंतर त्यात बटाटे मऊ होईपर्यत शिजवून घ्या. त्यानंतर यात भिजवलेला साबुदाणा घाला आणि चांगले मिक्स करा.

आता संपूर्ण मिश्रणावर झाकण घाला आणि खिचडी ५ मिनिटे शिजवून घ्या.

खिचडीमध्ये लिंबाचा रस टाकून २ ते ३ मिनिटे शिजवा. अशाप्रकारे साबुदाणा खिचडी तयार आहे.

Upvasachi Khichdi
Navratri 2025: नवरात्रीत या वस्तूंची करा खरेदी, घरात कधीच कशाचीही कमी पडणार नाही!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com