Kheer Recipe : देवीसाठी नैवेद्यात बनवा ओल्या नारळाची खिर; चव चाखताच संपूर्ण टोप फस्त कराल

Kheer Recipe for Navratri : घरच्याघरी खीर बनवणे फार सोप आहे. मात्र अनेक व्यक्तींना गोड पदार्थ हवे तसे अगदी परफेक्ट बनवता येत नाहीत. त्यामुळे आज या पदार्थांची रेसिपी जाणून घेणार आहोत.
Kheer Recipe for Navratri
Kheer RecipeSaam TV
Published On

लवकरच नवरात्रोत्वाला सुरुवात होत आहे. या उत्सवात प्रत्येक व्यक्ती देवीची मनोभावे सेवा करतो. देवीची आराधना करताना दररोज नवीन नैवेद्य देखील दाखवावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक पौष्टीक खिरीची रेसिपी सांगणार आहोत. ही खिर चविला अगदी टेस्टी असते. शिवाय ही खिर खाल्ल्याने आरोग्यास देखील अनेक पोषक तत्व मिळतात.

Kheer Recipe for Navratri
Besan Flour Different Recipes: बेसन पिठातले भजी खाऊन कंटाळा आलाय? मग आजच ट्राय करा 'या' रुचकर रेसिपी

नारळाची खीर बनवण्यासाठी प्रथम एक चमचा केशर घेऊन कोमट दुधात थोडावेळ भिजवून ठेवा. त्यानंतर गॅस ऑन करुन त्यावर एक पॅन ठेवा. त्या पॅनमध्ये दूध अॅड करुन दुधाला गरम होण्यासाठी उकळत ठेवा. त्यानंतर गरम दूध पॅनला चिकटून राहू नये म्हणून सतत चमच्याने यात ढवळत राहा. पॅनमध्ये टाकलेले दूध जोपर्यंत आर्धे होत नाही तोपर्यंत ढवळत राहा. दुध आर्धे झाल्यावर त्यात किसलेले नारळाचे खोबरे अॅड करा. त्यानंतर पुन्हा एक उकळी काढून घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.

हे सर्व मिश्रण साधारणपणे पंधरा-वीस मिनिटे मध्यम आचेवर शिजवत राहा. पूर्णपणे शिजल्यावर त्यात साखर, वेलची पावडर, काजू, बदाम, पिस्ता यांचे तुकडे अॅड करा. त्यानंतर त्यात वरुन भिजवलेले केशर मिक्स करा. यानंतर हे सर्व मिश्रण नीट एकजीव करुन घ्या.

त्यानंतर या मिश्रणाला पुन्हा एकदा पाच-सात मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर गॅस ऑफ करुन घ्या. बनवलेली नारळाची खीर थोडावेळ थंड होऊ द्या. अशा पद्धतीने आपली गरमा गरम स्वीट डिश तयार झाली आहे. तुम्ही नारळाच्या खीरला वरुन सजावटीसाठी पुन्हा एकदा काजू, बदाम आणि पिस्ताचे तुकडे कापून सर्व्ह करु शकता.

नारळाची खीर आरोग्यसाठी खूप फायदेशीर असल्याने पचनक्रिया चांगली राहते. त्याचबरोबर तुम्ही नारळाची खीर कोणत्याही सणासुदीच्या दिवशी बनवू शकता. नारळाची खीर खूप चविष्ट असते. नारळामध्ये फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे झटपट बनणारी नारळाची खीर कधीही तयार करा.

Kheer Recipe for Navratri
Khajoor Kheer: शुगर फ्री! खजूराची खीर बनविण्याची सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com