Rohini Gudaghe
दूध, खजूर, शेवया, वेलची पावडर, चिरलेले ड्रायफ्रुट्स, तूप
खजूर खीर बनवण्यासाठी एका भांड्यात दूध मध्यम आचेवर गरम करा.
कढईत एक चमचा तूप टाकून गरम करा.
तूप वितळल्यावर त्यात ड्रायफ्रुट्स टाका आणि गुलाबी होईपर्यंत तळा.
खजूरमधील बिया काढा. त्यात थोडं दूध टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
दुधाला उकळी आल्यावर त्यात भाजलेल्या शेवया टाका.
दूध निम्मे होईपर्यंत उकळावे लागते.
दूध घट्ट झाल्यावर गॅस बंद करून त्यात बारीक वाटलेले खजूर घाला.
आता पुन्हा गॅस चालू करा. एक-दोन मिनिटे खीर शिजू द्या. शेवटी खीरमध्ये सुका मेवा घाला.