

नवरात्रीचा सण अगदी काहीच दिवसांवर आला असून यंदा शारदीय नवरात्री कधीपासून सुरू होणार, याची उत्सुकता अनेकांना आहे. १० ऑक्टोबर की ११ ऑक्टोबर, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हिंदू पंचांगानुसार, आश्विन शुल्क पक्षातल्या प्रतिपदा तिथी १० ऑक्टोबरच्या रात्री ९ .१९ मिनिटांनी सुरू होऊन ११ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे उद्या तिथीच्या नियमानुसार नवरात्रीचा पहिला दिवस ११ ऑक्टोबर मानला जाईल.
११ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना करून नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात केली जाईल. घटस्थापनेसाठी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांपासून १० वाजून २६ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असल्याचे सांगितले जाते. या वेळेत घटस्थापना करणे शक्य नसल्यास दुपारी १२ वाजून २ मिनिटांपासून १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्तातही घटस्थापना करता येणार आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते. ११ ऑक्टोबरला शैलपुत्री, १२ ऑक्टोबरला ब्रह्मचारिणी, १३ ऑक्टोबरला चंद्रघंटा, १४ ऑक्टोबरला कूष्मांडा आणि १५ ऑक्टोबरला स्कंदमातेची पूजा केली जाईल.
त्यानंतर १६ ऑक्टोबरला कात्यायनी, तर १७ आणि १८ ऑक्टोबरला कालरात्रीची पूजा होईल. १९ ऑक्टोबरला महागौरी आणि सिद्धिदात्री या दोन्ही स्वरूपांची पूजा केली जाईल.
यंदा सप्तमी तिथी दोन दिवस असल्याने १७ आणि १८ ऑक्टोबरला सप्तमी राहणार आहे. १९ ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीचे पूजन होईल. याच दिवशी कन्या पूजनासह शारदीय नवरात्रीची सांगता होईल. त्यानंतर २० ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जाईल.
ज्योतिषाचार्य प्रवीण मिश्रा यांच्या माहितीनुसार, यंदा देवीचे आगमन हत्तीवरून होणार असल्याचे मानले जाते. नवरात्रीची सुरुवात रविवारी होत असल्याने देवीचे वाहन हत्ती असल्याचे धार्मिक मान्यतेत सांगितले जाते. देवीचे हत्तीवर आगमन हे सुख-समृद्धी आणि शुभ संकेताचे प्रतीक मानलं जातं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.