भारतात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत असून १२ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या काळात प्रत्येक भक्त देवीची मनोभावे सेवा करतात. असं म्हटलं जातं की आपल्या भक्तांसाठी देवी स्वत: पृथ्वीलोकात येते आणि आशीर्वाद देते. देवीची अराधना करताना घरी हवन कप देखील बनवले जातात. त्यामुळेच आज हवन कप नेमका कसा बनवतात याची माहिती जाणून घेणार आहोत.
माता राणीच्या सेवेत मग्न असताना तुम्ही घरातीलच काही साहित्य वापरून हवन कप बनवू शकता. यासाठी साहित्याची यादी पुढील प्रमाणे, पुजेसाठी वापरलेली सुकलेली फुले, गायीच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या,कापूर, नारळाच्या साली आणि तुळशीच्या सुकलेल्या बिया तसेच फांद्या या गोष्टींची आवश्यकता असते. या सर्व वस्तू अत्यंत शूभ आणि पवित्र मानल्या जातात.
पुढे या सर्व वस्तू आधी स्वच्छ करून घ्या. त्यानंतर सर्वकाही मिक्सरमध्ये भरून बारीक करून घ्या. बारीक झालेल्या मिश्रणात एक चमचा तूप आणि मध मिक्स करा. पुढे हे मिश्रण पिठ मळतात तसे मळून घ्या. मळलेल्या मिश्रणापासून सुंदर कप बनवून घ्या. हे हवन कप तुम्ही उन्हात सुकवू शकता. जर तुम्हाला उन्हात सुकवता येत नसतील फॅन खाली देखील तुम्ही हे हवन कप सुकवू शकता.
त्यासह हवन कप सुकण्यासाठी उन्हामध्ये एक दिवस पुरेसा आहे. तसेच तुम्ही घरात फॅन खाली सुकवत असाल तर त्यासाठी ३ ते ४ दिवस लागू शकतात. अशा पद्धतीने तुमचे हवन कप तयार झालेत. हवन कप छान वाळल्यावर ते खराब होत नाहीत. मात्र जर त्यात ओलावा राहिला तर खराब होण्याची शक्यता असते. आपण तयार केलेला हवन कप सर्व पवित्र वस्तूंचा वापर करून बनवलेला असतो. त्यामुळे देवीसमोर या हवन कपची धूप असल्यास देवी प्रसन्न होते.
हवन कप बनवल्यावर देवीसमोर धूप करताना सर्वात आधी त्यावर तूप आणि कापूर टाकून घ्या. त्यानंतर कप प्रज्वलीत करा. असे केल्याने संपूर्ण घर किंवा तेथील परिसरात सुगंध दरवळेल. हिंदू धर्मात अशी धार्मिक मान्यता आहे की, हवन कप आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.