राष्ट्रीय कँडी दिवस दरवर्षी 4 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, जो गोड प्रेमींसाठी एक खास दिवस आहे असे मानले जाते. या दिवसाचा उद्देश गोड कँडी आणि बालपणीच्या आठवणींवर प्रेम करणे हा आहे. लोक या दिवशी विविध प्रकारच्या मिठाईचा आनंद घेतात. 'कँडीचा आनंद घ्या आणि कुटुंब आणि मित्रांसोबत गोड क्षण साजरे करा.' हा दिवस असा संदेश आपल्याला देतो. या संबंधीत काही गोष्टी आपण जाणून घेवू.
राष्ट्रीय कँडी दिवस कधी साजरा केला जातो?
राष्ट्रीय कँडी दिवस दरवर्षी 4 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, हा दिवस गोड प्रेमींसाठी एक खास दिवस आहे. मित्र आणि कुटुंबासह साजरा हा दिवस साजरा करतात. या दिवशी तुम्ही मुलांना एकतरी कॅंडी घेवून द्यावी. सध्या बाजारात विविध प्रकारच्या कॅंडी मिळतात आणि आपण . मात्र बालपणात आपण कॅंडी विकत घेताना काही वेगळाच आनंद आणि उत्साह होता. आता हा उत्साह पुन्हा साजरा करण्याचा दिवस आहे.
'या' दिवसाचे महत्त्व काय आहे?
हा दिवस म्हणजे कॅंडीबद्दलचे आपले प्रेम साजरे करण्यासाठी, आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करण्याची ही एक उत्तम संधी आहे. आपल्याला आनंद ,पुन्हा जगण्याची संधी मिळते, हा दिवस आपल्याला साधेपणाचे आणि आनंदाचे छोटे क्षण देतो .
या दिवशी कोणत्या कँडी विशेषतः साजरे केले जातात?
या दिवशी चॉकलेट्स, हार्ड कँडीज आणि गमी कँडीजचा दिवस साजरा केला जातो. लोक त्यांच्या आवडत्या फ्लेवर्सचा आनंद घेतात.
या दिवशी काही विशेष उपक्रम आहेत का?
या दिवशी, मिठाई बनवण्याच्या स्पर्धा आणि गोड खाण्याच्या रेसिपींच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. लोक कँडीबद्दल माहिती देतात आणि नवीन चव अनुभवतात, मुलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात, हा दिवस कुटुंब आणि मित्रांसह एकत्र आनंद घेण्याचा दिवस आहे.
कँडीचा इतिहास काय आहे?
कँडीचा इतिहास प्राचीन काळापासून आहे, जेव्हा गोड पदार्थ नैसर्गिक घटकांपासून बनवले जात होते. हळूहळू, त्याच्या तयारीमध्ये विविध तंत्रे विकसित केली गेली, आज आपण विविध प्रकारच्या आणि स्वादिष्ट मिठाईचा आनंद घेतो, ही गोड आपल्या आयुष्यातील खास क्षणांना आणखी खास बनवते.
कॅंडी खाण्याचे फायदे
कॅंडी म्हणजे गोड पदार्थाचे सेवन केले जाते. त्यामुळे तुमची चिडचिड कमी होवू शकते. तसेच तुम्हाला सतत आळस येत असेल तर तुम्ही गोड कॅंडींचे सेवन करु शकता त्याने तुम्हचा उत्साह वाढू शकतो. हल्ली फळांच्या फ्लेवर्सनुसार कॅंडी तयार केल्या जातात. त्यात कमी प्रमाणात का होईना पण एक उत्तम चव आपल्याला मिळते.
Wrriten By: Sakshi Jadhav