Baby Care Tips
Baby Swallowed Vicks BoxSaam TV

Baby Swallowed Vicks Box : नाशिकमध्ये 1 वर्षाच्या बाळाने गिळली विक्सची डब्बी; घरात लहान मुलं असल्यास 'या' चुका पडतात महागात

Baby Care Tips : १ वर्षाच्या चिमुरड्याने विक्सची डब्बी गिळल्याची घटना मनमाड जवळच्या पाणेवाडी येथिल सागर काकड यांच्या घरी घडलीये.
Published on

लहान मुलांचा सांभाळ करणे फार कठीण काम आहे. प्रत्येक व्यक्तीला डोळ्यांत अगदी तेल घालून चिमुकल्या मुलांचा सांभाळ करावा लागतो. थोडं दुर्लक्ष झाल्यास मुलं काय करतील आणि काय नाही याचा काहीच नेम नसतो. अशात नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १ वर्षाच्या बाळाने थेट विक्सची डब्बी गिळली.

१ वर्षाच्या चिमुरड्याने विक्सची डब्बी गिळल्याची घटना मनमाड जवळच्या पाणेवाडी येथिल सागर काकड यांच्या घरी घडलीये. काकड कुटुंब रात्री घरात जेवण करत होते. त्यावेळी त्यांचा १ वर्षाचा मुलगा मल्हार याने विक्स डब्बी गिळली.

Baby Care Tips
Sarita Mehendale: ‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्री होणार लवकरच आई, Baby Bumpचे केले फोटो शेअर

आपल्या बाळाने विक्सची डब्बी गिळल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आणखी आत घुसल्याने काकड कुटुंबाने तातडीने मनमाडच्या देवकी चाईल्ड हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. डॉक्टरांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने बाळावर उपचार सुरू केली.

काही वेळच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांनी बाळाने गिळलेली डब्बी यशस्वीपणे बाहेर काढली आणि काकड कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला. या सर्व धावपळीत बाळ आणि त्याचे आई वडील फार घाबरले होते. मात्र डब्बी बाहेर निघाली असून बाळाची प्रकृती आता ठीक आहे.

लहान मुलं घरात असताना ही काळजी घ्या

लहान मुलं घरात असताना पालकांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.

घरामध्ये लहान मुलांना एकटं सोडू नका. त्यांच्या देखभालीसाठी सदैव एकाने त्यांच्याबरबोर राहा.

लहान मुलं त्यांच्या हाताला मिळले त्या वस्तू तोंडात ठेवून चोखतात. त्यामुळे मुलांसमोर लहान सहान वस्तू ठेवू नका.

लहान मुलांना खेळण्यासाठी सॉफ्ट खेळणी खरेदी करून द्या.

प्लास्टीकच्या गाड्या आणि भांडी कुंडी ३ वर्षांपर्यंत मुलांना देऊ नका. याने त्यांना इजा होण्याची शक्यता असते.

Baby Care Tips
Sarita Mehendale: ‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्री होणार लवकरच आई, Baby Bumpचे केले फोटो शेअर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com