Baby Planning Tips : दैनंदिन जीवनात तुम्हालाही 'या' सवयी आहेत? सावधान! आई-बाबा होण्याचं स्वप्न कधीच होणार नाही पूर्ण

Daily Habits That Affect Your Fertility : वाईट सवयींमुळे आई-बाबा होण्याच्या सुखाला आजवर अनेक जोडप्यांना मुकावं लागलं आहे. त्यामुळे व्यक्तींमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी प्रजनन सल्लागार डॉ. रितू हिंदुजा यांनी कोणकोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत याची माहिती दिली आहे.
Daily Habits That Affect Your Fertility
Baby Planning Tips Saam TV
Published On

नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी प्रजनन क्षमता उत्तम राखणे गरजेचे आहे. मात्र अनेक व्यक्ती दररोज जंक फूडचे सेवन करतात, तणाव, व्यायामाचा अभाव, धुम्रपान किंवा मद्यपान यासारख्या वाईट सवयींमुळे आई-बाबा होण्याच्या सुखाला आजवर अनेक जोडप्यांना मुकावं लागलं आहे. त्यामुळे व्यक्तींमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी प्रजनन सल्लागार डॉ. रितू हिंदुजा यांनी कोणकोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत याची माहिती दिली आहे.

अनेक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होणाऱ्या परिणामाकडे दुर्लक्ष करतात. या सवयी हळूहळू प्रजनन क्षमता कमी करू शकतात. ज्यामुळे जोडप्यांसाठी गर्भधारणेपर्यंतचा प्रवास तणावपूर्ण ठरतो.

प्रजनन क्षमता म्हणजेच गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मादरम्यान कमी गुंतागुंत आणि आरोग्य समस्यांसह नैसर्गिकरित्या कुटुंब सुरू करण्याची क्षमता. प्रत्येकजण हा आनंद सहजपणे अनुभवू शकत नाही. काही जोडप्यांना शुक्राणूंची संख्या कमी होणे, अंडकोषातील शिरा सुजणे, पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन आणि महिलांमधील फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशयाच्या समस्या, एंडोमेट्रिओसिस, हार्मोनल असंतुलन, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स सारख्या अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्यामुळे, तुमच्या प्रजननक्षमतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आवश्यक पाऊल उचलत आणि योग्य ती सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

या सवयी ज्या तुमच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करतात

1 . प्रोसेस्ड फूड्सचे सेवन : प्रक्रिया केलेले आणि पॅकेज फुड जास्त प्रमाणात खाणे तुमच्या प्रजननक्षमतेला बाधा आणू शकते. या पदार्थांमध्ये सोडियम, साखर, अनसॅच्युरेटेड फॅट्स, ॲडिटीव्ह आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हार्मोन्समध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. हार्मोनल असंतुलन शुक्राणू उत्पादन आणि ओव्हुलेशनमध्ये समस्या निर्माण करू शकते. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता असते. यामुळे प्रजननासंबंधीत पेशी आणि ऊतींचे नुकसान होते. चिप्स, चॉकलेट्स, कपकेक, पिझ्झा, पास्ता, नूडल्स, पाणीपुरी, आलू टिक्की आणि फ्रेंच फ्राईजसारखे जंक फूड खाणे टाळा.

2. तणाव : व्यस्त जीवनशैलीमुळे तणाव वाढू शकतो. दीर्घकालीन ताण हा तुमच्या एकुण आरोग्यावर तसेच प्रजनन क्षमतेवर लक्षणीय परिणाम करतो. हे स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकते, परिणामी मासिक पाळी अनियमित होते. कॉर्टिसॉल सारखे तणावास कारणीभूत संप्रेरक, रक्तदाब पातळी नियंत्रित करणे, चयापचय प्रक्रिया आणि जळजळ कमी करणे यासारख्या कार्यासाठी जबाबदार असतात ते तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. शुक्राणूंची निर्मिती आणि ओव्हुलेशन कमी करून पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि काम आणि जीवन यांच्यातील संतुलन राखणे आवश्यक आहे. ध्यानधारणा किंवा दीर्घ श्वासोच्छ्वास यांसारख्या तणाव-मुक्तीच्या पद्धती उपयुक्त ठरू शकतात.

3. व्यायामाचा अभाव: निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक हालचाली महत्त्वाच्या आहेत. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे किंवा पुरेशी हालचाल न केल्याने लठ्ठपणा आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमच्या प्रजननक्षमतेचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. जिम, वेट ट्रेनिंग, योग, ध्यान, पोहणे, धावणे किंवा बास्केटबॉल खेळणे यासारख्या क्रियांद्वारे दिवसातून 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सक्रिय राहणे गरजेचे आहे. हे तुमची शारीरीक क्षमता, ऊर्जा पातळी आणि प्रजनन आरोग्य सुधारु शकते.

4. व्यसन : धूम्रपान, सेकंड हॅड स्मोकींग आणि मद्यपान तसेच तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन पुरुष आणि महिला या दोघांच्याही प्रजनन प्रणालीवर परिणाम करते. टार, आर्सेनिक आणि निकोटीन यांसारख्या सिगारेटमध्ये असलेले हानिकारक विषारी पदार्थ शुक्राणू आणि स्त्रीबीज निर्मितीमध्ये व्यत्यय आणते व प्रजनन आरोग्यावर परिणाम करते. व्यसनांमुळे शुक्राणू आणि अंड्यांची गुणवत्ता आणि संख्या कमी होते आणि गर्भाधान प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. अल्कोहोलमुळे शुक्राणूंची खराब गुणवत्ता, कामवासना कमी होणे आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊन प्रजनन समस्या उद्भवू शकतात. एखाद्याने त्याची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी धूम्रपान, मद्यपान तसेच तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.

5. वाढता स्क्रिन टाईम आणि मोबाईल गॅझेट्सचा वापर: मोबाईल गॅझेट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर दीर्घकाळ वेळ घालवण्यामुळे बैठी जीवनशैली वाढू शकते. ज्यामुळे लठ्ठपणा आणि हार्मोनल असंतुलनची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. याव्यतिरिक्त, जास्त स्क्रीन टाईममुळे तणावाची पातळी वाढू शकते आणि झोपेची गुणवत्ता खालावू शकते, जे प्रजनन आरोग्यावर दुष्परिणाम करतात. हे परिणाम कमी करण्यासाठी स्क्रीनमधून टाईम कमी करणे आणि शारीरिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहणे महत्त्वाचे आहे.

6. वायफाय आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा एक्सपोजर: वायफाय आणि ब्लूटूथ उपकरणांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा प्रजनन क्षमतेवर होणारा संभाव्य परिणाम हा चिंतेचा विषय ठरत आहे. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMFs) च्या दीर्घकाळापर्यंत संपर्कामुळे पुरुषांमधील शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि गतिशीलतेवर तसेच स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाचा कार्यावर परिणाम होऊ शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com